- ऋजुता लुकतुके
मालिकेवर कब्जा केलेला भारतीय संघ (Indian team) पाचव्या धरमशाला कसोटीत आत्मविश्वासाने उतरेल. उलट इंग्लिश संघ आधीच बॅकफूटवर गेलेला असेल. ७ मार्चला दोन्ही संघ धरमशाला मैदानावर एकमेकांना भिडतील. मोहम्मद शामी, विराट कोहली आणि नंतर के एल राहुल असे अनुभवी खेळाडू संघात नसताना निवड समिती आणि संघ प्रशासनाने अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना न खेळवता युवा खेळाडूंना संधी दिली. आणि ध्रुव जुरेल, सर्फराझ खान, आकाशदीप यांनी संधीचं सोनं करत भारतीय विजयात मोठी भूमिका बजावली. (Ind vs Eng 5th Test)
या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीत एका शतकाचा अपवाद वगळता मोठी मजल मारु शकलेला नाही. पण, धरमशालामध्ये त्याला एक संधी आहे. गौतम गंभीर या माजी यशस्वी सलामीवीराला मागे टाकण्याची संधी रोहितकडे आहे. १२० धावा केल्या तर रोहित गंभीरला मागे टाकू शकेल. या आधीच्या राजकोट कसोटीत रोहितने ४,००० धावांचा टप्पा ओलांडला होता. (Ind vs Eng 5th Test)
Rohit Sharma completed 4000 runs in Test cricket.
– One of the greats across formats. ⭐🔥 pic.twitter.com/OgJyep82wy
— Johns. (@CricCrazyJohns) February 25, 2024
(हेही वाचा – BEST : ‘बेस्ट’चा पास महागला; पासधारकांच्या खिशाला बसणार कात्री)
भारतीय संघ सध्या ३-१ ने आघाडीवर
रोहितने सध्या ५८ कसोटींत ४,०३४ धावा केल्या आहेत त्या ४४ धावांच्या सरासरीने इतक्याच कसोटी सामन्यांत गंभीरने ४,१५४ धावा केल्या होत्या. त्याची सरासरी होती ४१ धावांची. (Ind vs Eng 5th Test)
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ सध्या ३-१ ने आघाडीवर आहे. विराट, शामी आणि के एल राहुल या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत हे यश मिळवल्यामुळे रोहितच्या नेतृत्वाची सध्या तारीफ होत आहे. तर आक्रमक क्रिकेटचा बॅझ-बॉल ब्रँड घेऊन भारतात आलेला इंग्लिश संघ सध्या बॅकफूटवर गेला आहे. कर्णधार बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम यांनी दोन वर्षांत गमावलेली ही पहिली मालिका आहे. (Ind vs Eng 5th Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community