‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ने देशातील ६ राष्ट्रीय पक्षांचे (Political Party) २०२२-२३ या आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न एका अहवालाद्वारे घोषित केले. ते ३ हजार ७७ कोटी रुपये असून त्यात भाजपचा वाटा सर्वाधिक आहे. या कालावधीत भाजपचे एकूण उत्पन्न २ हजार ३६१ कोटी रुपये होते. हे प्रमाण ६ राष्ट्रीय पक्षांच्या एकूण उत्पन्नाच्या ७६.७३ टक्के इतके आहे. भाजपच्या खालोखाल ४५२.३७५ कोटी रुपयांच्या उत्पन्नासह काँग्रेस दुसर्या क्रमांकाचा पक्ष आहे. हे प्रमाण एकूण उत्पन्नाच्या १४.७ टक्के आहे. भाजप आणि काँग्रेस यांच्या व्यतिरिक्त बसप, आप, एन्.पी.पी. (नॅशनल पीपल्स पार्टी) आणि माकप यांनी त्यांचे उत्पन्न जाहीर केले आहे. (Political Party)
काय म्हटले आहे या अहवालात?
- भाजपच्या उत्पन्नात २३.१५ टक्क्यांची म्हणजे ४४३ कोटी रुपयांची वाढ झाली.
- आम आदमी पक्षाचे उत्पन्न तब्बल ९१.२३ टक्क्यांनी वाढून ते ८५.१७ कोटी रुपये झाले.
- काँग्रेसचा विचार करता त्याचे उत्पन्न १६.४२ टक्क्यांनी म्हणजे ८८.९० कोटी रुपयांनी वाढले.
राजकीय पक्षांच्या (Political Party) खर्चाचे प्रमाण !
- भाजप : पक्षाने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये एकूण उत्पन्नाच्या केवळ ५७.६८ टक्के म्हणजे १ हजार ३६१ कोटी रुपये खर्च केले.
- काँग्रेस : याच कालावधीत काँग्रेसने ४६७.१३५ कोटी रुपये खर्च केले. हे त्याच्या उत्पन्नापेक्षा ३.२६ टक्क्यांनी अधिक होते.
- आप : पक्षाचे एकूण उत्पन्न ८५.१७ कोटी रुपये होते, तर त्याने १०२.०५१ कोटी रुपये म्हणजे एकूण उत्पन्नाच्या १९.८२ टक्के अधिक खर्च केले.