Marais Erasmus : ज्येष्ठ क्रिकेट पंच मारे इरासमस लवकरच होणार निवृत्त

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची मालिका इरासमस यांची शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका असेल. 

150
Marais Erasmus : ज्येष्ठ क्रिकेट पंच मारे इरासमस लवकरच होणार निवृत्त
  • ऋजुता लुकतुके

दक्षिण आफ्रिकेचे अनुभवी क्रिकेट पंच मरे इरासमस यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आणि सध्या सुरू असलेली ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड ही मालिका त्यांची शेवटची असेल. इरासमस हे दक्षिण आफ्रिकेत देशांतर्गत क्रिकेटही खेळले आहेत. बोलंड या स्थानिक संघाचे ते मुख्य तेज गोलंदाज होते. त्यानंतर २००६ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्यांदा पंच म्हणून काम पाहिलं. (Marais Erasmus)

आताच्या घडीचे सगळ्यात अनुभवी क्रिकेट पंच आहेत. त्यांनी ८० कसोटी, १२४ एकदिवसीय सामने आणि ४३ टी-२० सामन्यांत पंच म्हणून कामगिरी बजावली आहे. तर टीव्ही पंच म्हणूनही त्यांनी १३१ सामन्यांमध्ये काम पाहिलं आहे. ‘आंतरराष्ट्रीय प्रवास आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या वेळी मिळणारा मान या गोष्टींपासून मी दूर जाणार आहे, याचं दु:ख आहे. पण, माझे कुटुंबीयं आणि नेहमीच्या भोवतालापेक्षा खूप काळ मी लांब राहिलो आहे. आणि त्याच कंटाळवाण्या आयुष्याकडे परतण्याची वेळ आता झाली आहे,’ असं इरासमन मिष्किलपणे म्हणाले. (Marais Erasmus)

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी आयसीसीला आपल्या निवृत्तीची आगाऊ सूचना दिली होती. २०२३ चा हंगाम त्यांचा शेवटचा असेल असं त्यांनी तेव्हा म्हटलं होतं. (Marais Erasmus)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : भाजपा मोठ्या चेहऱ्यांना तिकीट नाकारणार?)

दक्षिण आफ्रिकेसाठी देशांतर्गत सामन्यात करणार पंचगिरी

इरासमस यांनी आयसीसीचा सर्वोत्तम पंचासाठी असलेला पुरस्कार तब्बल तीनवेळा जिंकला होता. २०१६, २०१७ आणि २०२१ मध्ये ते या पुरस्काराचे मानकरी ठरले. रिचर्ड केटलबरो आणि आलीम दर यांनाही हा पुरस्कार तीनदा मिळाला आहे. तर सायमन टॉफेल या यादीत सगळ्यात वर असून त्यांनी हा पुरस्कार पाचव्यांदा पटकावला होता. (Marais Erasmus)

निवृत्तीनंतर इरासमन पहिले तीन महिने विश्रांती आणि कुटुंबीयांबरोबर प्रवास करणार आहेत. आणि त्यानंतर ते क्रिकेट दक्षिण आफ्रिकेसाठी देशांतर्गत सामन्यात पंचगिरी करत राहतील. आणखी एका देशांतर्गत हंगामानंतर मात्र ते आफ्रिकेतील नवीन पंचांना मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेत जातील. (Marais Erasmus)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.