Samruddhi Mahamargच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण लवकरच, अखेर ‘ही’ तारीख ठरली

समृद्धी महामार्ग ७०१ कोलोमीटर लांबीचा असून डिसेंबर २०२२ मध्ये त्यातील पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी ५२० किमीचा महामार्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर शिर्डी ते भरवीरपर्यंत हा महामार्ग सुरू करून एकूण ६०० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग लवकरच सुरू होत आहे.

257
Samruddhi Mahamargच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण लवकरच, अखेर 'ही' तारीख ठरली
Samruddhi Mahamargच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण लवकरच, अखेर 'ही' तारीख ठरली

समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाची तारीख ठरली. हा लोकार्पण सोहळा लवकरच होणार आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यादरम्यान हा महामार्ग तयार होत आहे. आतापर्यंत समृद्धी महामार्गाचा सहाशे किलोमीटरचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. सध्या जवळपास ९० टक्के काम पूर्ण झालेलं असून आता भरवीर ते इगतपुरी असा तिसरा टप्पा सुरू होणार आहे.

उद्घाटन कधी?
समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा ४ मार्चला होणार आहे. भरवीर ते इगतपुरी असा हा २३ किलोमीटरचा टप्पा आहे. समृद्धी महामार्ग ७०१ कोलोमीटर लांबीचा असून डिसेंबर २०२२ मध्ये त्यातील पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी ५२० किमीचा महामार्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर शिर्डी ते भरवीरपर्यंत हा महामार्ग सुरू करून एकूण ६०० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग लवकरच सुरू होत आहे.

(हेही वाचा – Shiv Sena : शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारामध्ये धक्काबुक्की; मुख्यमंत्र्यांनी धरले मौन)

लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरू होणार
प्रवाशांसाठी ४ मार्चपासूनच हा महामार्ग सुरू केला जाणार आहे. हा महामार्ग भरवीर ते इगतपुरी असून याच्या २५ किलोमीटर लांबीचा तिसरा टप्पा लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मार्च २०२४मध्ये भरवीर ते इगतपुरी हा तिसरा टप्पा असून २५ किलोमीटर लांबीचा आहे.

नाशिक मार्गावर होणारी वाहतूक कोंडी कमी होणार
समृद्धी महामार्गाच्या भरवीर-इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यास घोटी-सिन्नर मार्गावर वाहनधारकांच्या प्रवासातील तब्बल दीड तास वाचणार आहे. इगतपुरीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्गावर जाता येणार आहे. त्यामुळे भिवंडीपासून इगतपुरीपर्यंत नाशिक मार्गावर होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.