Paytm Crisis : पेटीएम युपीआयने अखेर पेमेंट्स बँकेशी तोडले व्यवहार

Paytm Crisis : पेटीएम कंपनीचं पेमेंट्स बँकेवर असलेलं अवलंबित्व कमी व्हावं यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे

184
Paytm Crisis : पेटीएम युपीआयने अखेर पेमेंट्स बँकेशी तोडले व्यवहार
Paytm Crisis : पेटीएम युपीआयने अखेर पेमेंट्स बँकेशी तोडले व्यवहार

ऋजुता लुकतुके

पेटीएम कंपनीने पेटीएम पेमेंट्स (Paytm Crisis) बँकेबरोबर असलेले अनेक प्रकारचे व्यापारी संबंध आणि व्यवहार तोडत असल्याचं गुरुवारी जाहीर केलं आहे. यामुळे दोन्ही कंपन्यांचं एकमेकांवर अवलंबित्व कमी होईल. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं ही बातमी दिली आहे. पेटीएम पेमेंट्स (Paytm Crisis) बँकेचे अकार्यकारी अध्यक्ष म्हणून संस्थापक विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांनी राजीनामा दिल्या नंतर काही दिवसांत ही घडामोड घडली आहे. विजय शेखर (Vijay Shekhar Sharma) यांच्याकडे पेमेंट्स बँकेची ५१ टक्के हिस्सेदारी होती. तर पेटीएमकडे उर्वरित हिस्सेदारी होती. (Paytm Crisis)

पेटीएम किंवा वन कम्युनिकेशन्स या मूळ कंपनीचे अनेक उद्योग आहेत. यात पेटीएम हे एक युपीआय ॲपही आहे. आणि पेटीएम पेमेंट्स (Paytm Crisis) बँक तसंच पेटीएम वॉलेट (Paytm Wallet), फास्टटॅग अशा सेवाही कंपनीने सुरू केल्या आहेत. पण, अलीकडे पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) घातलेल्या निर्बंधांमुळे कंपनीचं अख्खं बिझिनेस मॉडेलच डळमळीत झालं आहे. ते सुधारण्याच्या दृष्टीने आता कंपनी एक एक पाऊल टाकताना दिसतेय. (Paytm Crisis)

(हेही वाचा- Kasaragod Tourist Places : कसरगोडमध्ये फिरण्यासाठी उत्कृष्ट ठिकाणे)

पेटीएम संकट नेमकं काय आहे?

रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) पेटीएम कंपनीची एक उपकंपनी पेटीएम पेमेंट्स (Paytm Crisis) बँकेवर फेब्रुवारी महिन्यात कठोर निर्बंध लागू केले. १५ मार्चपासून पेमेंट्स बँकेला नवीन ठेवी, मुदतठेवी किंवा वॉलेट आणि फास्टटॅग खात्यांमध्ये नवीन रक्कम स्वीकारता येणार नाहीए. पेमेंट्स बँकेनं (Paytm Crisis) रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank) नियमांचं पालन आणि बँकिंग व्यवहारांसाठी दिलेल्या परवान्यातील अटी मोडल्याचा ठपका रिझर्व्ह बँकेनं पेटीएमवर ठेवला आहे.

शिवाय ग्राहकांकडून केवायसी ओळखपत्र घेतानाही चालढकल केल्याचा आरोप कंपनीवर आहे.

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, पेटीएम कंपनीने (Paytm Company) हजारो खात्यांसाठी ग्राहकांची नीट ओळखपत्रच जमा केली नव्हती. त्यातून हे ग्राहक आणि त्यांचे पैसे नेमके कुठून आले यावर रिझर्व्ह बँकेला (Reserve Bank) संशय आला. आणि बँकेनं हे प्रकरण सक्तवसुली संचलनालयाकडे नेलं. चीनमधील कंपन्यांमधून पेटीएममध्ये गुंतवणूक होत असल्याचा संशय वाढला. आणि तशी चौकशीही सुरू झाली. दुसरीकडे, पेमेंट्स बँकेच्या (Paytm Crisis) काम करण्याच्या पद्धतीतही अनियमितता आढळली. अर्थात, पेटीएम कंपनीने (Paytm Company) या अनियमितता सुधारण्याचं आश्वासन रिझर्व्ह बँकेला दिलं आहे. आणि सध्या कोणतेही निर्बंध नसलेली युपीआय सेवा सुरळीत सुरू रहावी यासाठी कंपनीने वरील पाऊल उचललं आहे. (Paytm Crisis)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.