BMC Road : महापालिका रस्ते विभागाने ४८ तासात निवीदा ते मंजुरी देण्याची साधली किमया? 

रस्ते विभागाची अशीही कार्य तत्परता, ऐकून थक्क व्हाल

3221
Ashray Yojna : भायखळ्याच्या  टँक पाखाडी पुनर्विकासात ‘हाय रॉक’साठी बदलला बांधकामाचा आराखडा
Ashray Yojna : भायखळ्याच्या  टँक पाखाडी पुनर्विकासात ‘हाय रॉक’साठी बदलला बांधकामाचा आराखडा
मुंबई महापालिकेच्या (Mumbai municipal corporation) रस्ते (road) विभागातील अधिकाऱ्यांचा  आता जाहीर सत्कार करण्याची वेळ आली आहे. (BMC Road) एका बाजूला रस्ते (road) विभागातील  अभियंते निवडणूक कामासाठी गेल्याने रस्ते (BMC Road) विकासाची अनेक कामे रखडली जाण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच तब्बल  ७०० कोटी  रुपयांचे  कंत्राट काम अवघ्या ४८ तासात फत्ते होत आहे. २८ फेब्रुवारीला दुपारी निविदा खुली झाल्यानंतर (BMC Road) पात्र कंपनीच्या निवडीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठीचा मसुदा  तयार करून प्रशासकाच्या  मंजुरीसाठी पाठवण्यात आला. अवघ्या ४८ तासात प्रशासकीय मंजुरी घेवून शुक्रवार किंवा शनिवारी कंत्राटदाराच्या हाती  कार्यादेश सोपवण्याच्या या हालचालींबाबत रस्ते विभाग कौतुकास पात्र ठरत आहे. त्यामूळे अतिरीक्त आयुक्त प्रकल्प आणि त्यांचे रस्ते (road) विभाग हे जनतेसाठी नव्हे तर कंत्रादारांसाठी काम करत असल्याचे स्पष्ट होत आहे. (BMC Road)
एम.एम.आर.डी.ए. ने पश्चिम द्रुतगती महामार्ग (Highway) आणि पुर्व द्रुतगती महामार्ग (Highway) माहे नोव्हेंबर २०२२ मध्ये  महानगरपालिकेला (Mumbai municipal corporation) सुपूर्द केले असून (BMC Road) प्रवास सुकर करण्याकरिता दोन्ही महामार्गाची (Highway) देखरेख ठेवली जात आहे. त्याचवेळी, दोन्ही महामार्गावरील प्रवेश नियंत्रण प्रकल्पांतर्गत (Access Control Project), पूर्व द्रुतगती महामार्गावर  (Highway) एक (BMC Road) संगमस्थान आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर (Highway) तीन संगमस्थानांची सुधारणा करण्यात येणार असल्याची घोषणा महापालिका आयुक्त  तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी आपल्या  अर्थ  अर्थसंकल्पीय भाषणात  केली होती. (BMC Road) महामार्गांवर होणारी वाहनांची कोंडी आणि धिम्या गतीने होणारी वाहतूक अधिक गतीशिल बनवण्यासाठी  हा निर्णय घेत महापालिकेने (Mumbai municipal corporation) तातडीने निविदा मागवल्या.
याच्या प्राप्त निविदा २८ फेब्रुवारी २०२४ रोजी उघडण्यात आल्या. या निविदेत प्रशासकीय अंदाजित दराच्य तुलनेत सात  टक्के अधिक दराने सुमारे ७५८ कोटी रुपयांमध्ये  बोली लावत आर.पी. एस.इन्फ्राप्रोजेक्ट (RPS Infraproject ) ही कंपनी पात्र ठरली आहे. निविदा २८ फेब्रुवारीला दुपारी उघडण्यात आल्या नंतर लेखा (वित्त) विभागाच्या मंजूरी नंतर उपायुक्त (पायाभूत सेवा) यांच्या मंजुरीनंतर  २९ फेब्रुवारीला रस्ते (road) विभागाने  अतिरीक्त आयुक्त प्रकल्प यांच्य स्वाक्षरीने आयुक्तांच्या मंजुरीला पाठवले. या आयुक्तांचा स्वाक्षरीने कंत्राट निवडीचा मसुद्याचा प्रस्ताव स्थायी समितीला पाठवून प्रशासक मंजुरीचे शुक्रवारी रात्री पर्यंत किंवा शनिवारी याचा  कार्यादेश बजाविण्याची कार्यवाही रस्ते विभागाने सुरू केली आहे. (BMC Road)
एरव्ही कोणत्याही कामाच्या निविदा काढल्यानंतर कंत्राटदाराच्या अंतिम निवडी नंतर त्याच्या प्रशासक मंजुरीचा  मसुदा बनवायला महिनोन्महिने घेणाऱ्या या विभागाच्या अधिकाऱ्यांची कार्य  तत्परता पाहता जर या विभागाने मनात आणले तर एका दिवसात कंत्राटदार नेमून दोन ते तीन दिवसात कामाला सुरुवात करू शकतात.  पण हे सर्व  कंत्राटदाराला फायदा मिळवून देण्यासाठीच हा खटाटोप असल्याने  महापालिकेचे (Mumbai municipal corporation) अधिकारी हे जनतेसाठी नव्हे तर कंत्राटदारांसाठीच काम करत असतात हे स्पष्ट होतेय. (BMC Road)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.