रिझर्व्ह बँकेने (RBI) २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आतापर्यंत एकूण २००० रुपयांच्या (2000 rupee notes) ९७.६२ टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने एका निवेदनाद्वारे दिली आहे.
(हेही वाचा – Bangalore Blast : बंगळुरुतील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट, ५ जण जखमी)
आरबीआयने दिली प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती :
आरबीआयने (RBI) आज म्हणजेच शुक्रवार १ मार्च रोजी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. १९ मे २०२३ रोजी RBI ने देशातून २००० रुपयांच्या नोटा काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय बँकेने म्हटले आहे की, २००० रुपयांच्या नोटा (2000 rupee notes) देशात कायदेशीर निविदा राहतील, म्हणजेच आता आरबीआयने या नोटा चलनातून बाहेर काढल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. नोटांना पूर्णपणे नोटाबंदीच्या कक्षेत आणले गेले नाही, असे आरबीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे.
The Reserve Bank of India (RBI) had announced the withdrawal of Rs 2000 denomination banknotes from circulation.
The total value of Rs 2000 banknotes in circulation, which was Rs 3.56 lakh crores at the close of business on May 19, 2023, when the withdrawal of Rs 2000 banknotes… pic.twitter.com/2eF3YuVAyK
— ANI (@ANI) March 1, 2024
२०२६ मध्ये झाली होती नोटबंदी :
२०१६ रोजी चलनात असलेल्या सर्व ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा (RBI) रद्द केल्यानंतर अर्थव्यवस्थेच्या चलनाची गरज जलद गतीने पूर्ण करण्यासाठी आरबीआयने नोव्हेंबर २०१६ मध्ये २००० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या.
(हेही वाचा – Gadchiroli Accident : गडचिरोलीत एसटी बसची दुरवस्था, धावत्या बसने अचानक घेतला पेट)
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार,
इतर नोटा चलनात पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर २ हजार रुपयांच्या नोटा (2000 rupee notes) चलनात आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले. त्यानंतर म्हणजेच २०१८ – १९ मध्ये २००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती. (RBI)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community