टाटा समुहाच्या एका शेअर्समध्ये (Share Market) शुक्रवारी तुफान तेजी झाली. शुक्रवारी हा शेअर्स १० टक्क्यांनी वाढल्यामुळे ६३७.०५ रुपयांवर पोहोचला. टाटा समुहाच्या ऑटोमोटीव्ह स्टॅम्पिंग्ज अॅण्ड असेंबलीज लिमिटेडचा हा शअर्स आहे. जमशेदपूर येथे या कंपनीने एका प्रकल्पाअंतर्गत नवीन व्यावसायिक उत्पादन सुरू केले आहे, अशी घोषणा ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्जने केली आहे.
ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्जने जानेवारी महिन्यात सांगितले होते की, जमशेदपूरमध्ये नवा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट तयार करत आहेत. याबाबत , “२९ फेब्रुवारी २०२४पासून जमशेदपूर येथील नव्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये कमर्शियल प्रोडक्शन सुरू झाले आहे. ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्जच्या शेअरमध्ये आलेल्या तेजीनंतर , कंपनीचे मार्केट कॅप १०१० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.”, हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे.
(हेही वाचा – Narendra Modi: झारखंड मुक्ती मोर्चा म्हणजे जमकर खावो; कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत मोदी म्हणाले… )
४ वर्षांत शेअर्स वधारला…
ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्ज अॅण्ड असेम्बलीजच्या शेअरमध्ये २० मार्च २०२०ला १३ रुपयांवर होता. तो १ मार्च २०२४ला ६३७.०५ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ३ वर्षांत कंपनीच्या शेअरमध्ये १५४१ टक्क्यांची तेजी आली आहे. या काळात कंपनीचा शेअर ३८.८० रुपयांनी वाढून ६३७.०५ रुपयांवर पोहोचला आहे तसेच गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये ११३ टक्क्यांची तेजी आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community