Pulse Polio Vaccination Campaign: नवी मुंबईत रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

339
Pulse Polio Vaccination Campaign: नवी मुंबईत रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
Pulse Polio Vaccination Campaign: नवी मुंबईत रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात रविवार, ३ मार्चला राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये 0 ते ५ वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ लसीकरण (Pulse Polio Vaccination Campaign) करण्यात येणार असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने पोलिओ लसीकरणाचे सुयोग्य नियोजन केले आहे.

भारत देश पोलिओमुक्त आहे. परंतु काही देशांमध्ये अद्याप पोलिओ असल्याने तो पुन्हा परत येऊ शकतो यासाठी पल्स पोलिओ मोहीम राबविली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 0 ते ५ वर्ष वयोगटामधल्या अपेक्षित ९१३८९ बालकांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेऊन मोहीमेचे नियोजन करण्यात आले आहे. त्याकरिता २४ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ६०९ स्थायी, ९३ ट्रांझिट व २७ फिरते मोबाईल असे एकूण ७२९ बुथ कार्यरत असणार आहेत. या लसीकरण मोहिमेसाठी मॉल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड अशा वर्दळीच्या ठिकाणी ट्रांझिट व फिरती मोबाईल पथके तयार करण्यात आलेली आहेत.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : खोके खोके म्हणणाऱ्यांनीच आमच्या खात्यातून ५० कोटी घेतले)

सिटी टास्क फोर्स समितीची बैठक
त्याचप्रमाणे महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांच्या अध्यक्षेतखाली सिटी टास्क फोर्स समितीची बैठक घेण्यात आली असून नियोजनाचा आढावा घेण्यात आला. तसेच पल्स पोलीओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्याकरिता वैद्यकीय अधिकारी, एनएम, एलएचव्ही, एएनएम, आशा व स्वयंसेवक यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. या मोहीमेकरीता महापालिका कार्यक्षेत्रात जनजागृतीपर पोस्टर्स व बॅनर्स लावण्यात आले आहेत. पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेच्या दिवशी बूथवरील स्वयंसेवकांनी बाळाला हाताचा स्पर्श होणार नाही याची काळजी घेणे. तसेच डाव्या कंरगळीवर पेनने खूण करताना बाळाचा हात न पकडणे याबाबत प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.

पालकांना आवाहन…
या पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत ज्या बालकांनी 0३ मार्च रोजी डोस घेतला नसेल त्यांना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ८९८ टिमव्दारे गृहभेटीमध्ये पुढील ५ दिवस घरोघरी जाऊन डोस देण्यात येणार आहे. याकरिता प्रत्येक टिमचे कार्यक्षेत्रनिहाय सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. तरी पालकांनी पोलिओवर मात करण्यासाठी देशव्यापी मोहिमेत सहभागी व्हावे आणि आपल्या 0 ते ५ वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पल्स पोलिओ लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.