राज्य विधिमंडळाच्या (Legislative Council) अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप शुक्रवारी वाजले आहे. तत्पूर्वी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या अधिवेशनात सभागृहात झालेल्या कामकाजाची आकडेवारी सभागृहाला सांगितली. या अधिवेशनात ५ बैठका झाल्या. त्यात २८ तास ३२ मिनिटे कामकाज झाले. विविध कारणांमुळे सभागृहाचा ३१ मिनिटांचा वेळ वाया गेला, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
दररोज सरासरी ५ तास ४२ मिनिटे कामकाज झाले. नियम ५७ अन्वये १४ सूचना मिळाल्या. मान्य सूचना निरंक व चर्चा सूचना निरंक आहेत, असे ते म्हणाले.