बारामतीमध्ये सध्या राजकारण तापले आहे. कारण आहे नमो रोजगार मेळावा. या ठिकाणी शनिवार, २ मार्च रोजी सकाळीच मेळावा होत आहे. या कार्यक्रमात पहिल्यांदाच राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार हे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. त्यामुळे याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शासकीय कार्यक्रमात एकत्र आले होते, मात्र त्यावेळी अजित पवार यांनी अंतर ठेवूनच व्यासपीठावर वावर ठेवला होता. या कार्यक्रमात मात्र अजित पवार यांचा प्रमुख वावर असणार आहे, अशा वेळी ते शरद पवारांशी ते (Sharad Pawar) कसे वर्तन करणार हे पाहावे लागणार आहे.
शरद पवारांच्या खेळीपासून सत्ताधाऱ्यांची सुटका
विशेष म्हणजे जेव्हा या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका छापण्यात आली होती, तेव्हा त्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव नव्हते, तेव्हा पवार यांनी आपण स्वतः या कार्यक्रमात हजर राहणार आहे, असे म्हटले होते. तसेच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना तुम्ही बारामतीमध्ये येत आहात म्हणून आपल्या निवासस्थानी जेवणासाठी यावे असे लेखी निमंत्रणही दिले होते. पवारांच्या (Sharad Pawar) या खेळीमुळे सत्ताधाऱ्यांची गोची झाली होती. अखेरीस यातून मार्ग काढत नवीन निमंत्रणपत्रिका बनवण्यात आली आणि त्यात शरद पवारांचे नाव टाकण्यात आले, तसेच पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे जेवणाला येता येणार नाही, असे कारण देत यातून अंग काढून घेतले, मात्र आता व्यासपीठावर शरद पवार (Sharad Pawar) दिमाखात बसणार आहेत. कदाचित भाषणही करतील, अशा वेळी राजकीय आरोप प्रत्यारोप नक्की होणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Join Our WhatsApp Community