Mum vs Tn Ranji SF : श्रेयस अय्यरच्या समावेशामुळे मुंबईचा कर्णधार रहाणे खुश

बीसीसीआयने कानपिचक्या दिल्यानंतर श्रेयस अय्यर मुंबईच्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात खेळणार आहे.

177
Mum vs Tn Ranji SF : श्रेयस अय्यरच्या समावेशामुळे मुंबईचा कर्णधार रहाणे खुश
Mum vs Tn Ranji SF : श्रेयस अय्यरच्या समावेशामुळे मुंबईचा कर्णधार रहाणे खुश
  • ऋजुता लुकतुके

देशात एकीकडे भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेची धूम सुरू असतानाच रणजी करंडकात उपान्त्य फेरीचे सामनेही शनिवारपासून सुरू होत आहेत. आणि त्यातला पहिला सामना आहे तो मुंबई विरुद्ध तामिळनाडू. (Mum vs Tn Ranji SF) मुंबईत बीकेसी मैदानात होणाऱ्या या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) खेळणार आहे. त्यामुळे मुंबईची फलंदाजीची बाजू भक्कम झाली आहे. तर तामिळनाडूकडूनही वॉशिंग्टन सुंदर खेळणार आहे.

रणजी सामन्यांना दांडी मारल्यामुळे दोनच दिवसांपूर्वी बीसीसीआयने श्रेयस आणि इशानला मध्यवर्ती करार असलेल्या खेळाडूंच्या यादीतून वगळलं आहे. श्रेयस गेले काही दिवस पाठदुखी आणि जांघेच्या दुखापतीची तक्रार करत होता. पण, आता ती दुखापत बरी असून तो मुंबईसाठी खेळणार असल्याचं त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळवलं आहे.

श्रेयसच्या समावेशामुळे मुंबई रणजी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) आनंद व्यक्त केला आहे. ‘श्रेयस अनुभवी खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली, तो मुंबईसाठी खेळला आहे. आणि त्याचं योगदान कायम महत्त्वाचं राहिलं आहे. त्यामुळे श्रेयसच्या समावेशामुळे आम्ही एकदम खुश आहोत,’ असं अजिंक्य सामन्यापूर्वी मीडियाशी बोलताना म्हणाला. (Mum vs Tn Ranji SF)

(हेही वाचा – Bajrang Punia : बजरंग पुनिया पुन्हा एकदा कुस्ती फेडरेशनच्या विरोधात)

अलीकडेच श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि इशान किशनवर रणजी सामने न खेळल्यावरून टीका झाली होती. दोघांनी आयपीएलला प्राधान्य देऊन स्पर्धेसाठी तंदुरुस्ती टिकावी यासाठी रणजी सामन्यांना दांडी मारली असा दोघांवर आरोप होता. भारतीय संघ प्रशासनाने रणजी खेळण्याचा सल्ला दिलेला असूनही दोघं रणजीत खेळले नाहीत, असं बोललं जात होतं. पण, करारातून वगळल्यावर मात्र श्रेयस तातडीने मुंबईकडून उपान्त्य सामना खेळायला तयार झाला आहे. (Mum vs Tn Ranji SF)

श्रेयसच्या समावेशामुळे मधली फळी तर मजबूत होईलच शिवाय मुंबईच्या खेळाडूंना अनुभवी खेळाडूचा सहवास मिळेल, असं मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) वाटतंय. खुद्द रहाणेचा फॉर्म या रणजी हंगामात खालावलाय. पण, हा तात्पुरता काळ आहे. फलंदाजीचं तंत्र चुकत नाहीए. त्यामुळे कामगिरीही सुधारेल, असं अजिंक्यला वाटतंय. (Mum vs Tn Ranji SF)

मुंबई संघाने विक्रमी ४१ वेळा रणजी करंडकावर आपलं नाव कोरलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.