Ajit Pawar : काम करायचे तर एक नंबर, नाहीतर भानगडीतच पडायचे नाही; शरद पवारांच्या उपस्थित अजित पवार असे का म्हणाले?

244

राज्य सरकारच्या मदतीने बारामतीमध्ये चांगल्या वास्तू उभ्या केल्या. अजून अनेक काम पाइपलाइनमध्ये आहेत, त्यासाठी राज्य सरकारच सहकार्य लागेल. मी फुशारकी नाही मारणार, पण पायाभरणी झाल्यानंतर मी प्रत्येक इमारतीच काम सुरु असताना तिथे 40 वेळा जाऊन भेट दिली. आज बारामतीमध्ये नंबर 1 च बस स्थानक उभे केले. काम करायच तर एक नंबर, नाहीतर भानगडीतच पडायच नाही, विकासाच्या बाबतीत बारामतीला मी एक नंबरचा तालुका बनवीन, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

(हेही वाचा Scam : शिखर बँकेच्या घोटाळ्याचा तपास बंद करा; आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचा न्यायालयात अर्ज)

जर्मनीसोबत करार केला 

बारामतीमध्ये शनिवार, २ मार्च रोजी नमो महारोजगार मेळावा झाला. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारही मंचावर उपस्थित होते. राज्यात होणाऱ्या या नमो महारोजगार मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. मराठवाडा, लातूर इथे झालेल्या नमो महारोजगार मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सातारा या पाच जिह्यांचा मेळावा बारामतीमध्ये होत आहे, असे अजित पवार म्हणाले. अजित पवार या मेळाव्यात भाषण करताना फक्त बारामतीच्या विकासाबद्दल बोलले. त्यांनी कुठल्याही राजकीय मुद्यावर भाष्य केले नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर्मनीसोबत करार केला आहे. जर्मनीला पाच लाख मुला-मुलींची गरज आहे. फक्त जर्मन भाषा आली पाहिजे अशी त्यांची अट आहे. आपल्या देशात, राज्यात, परदेशात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे. पण फक्त संधीच सोन करता आले पाहिजे, असे अजित पवार (Ajit Pawar)  म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.