देशातील प्रमुख मुद्द्यांवर धोरणात्मक चर्चा करण्यासाठी, विविध योजनांच्या अंमलबजावणीचा फिडबॅक घेण्यासाठी आणि सरकारी कामकाजावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांकडून वेळोवेळी मंत्रिमंडळाची बैठक बोलावित असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्या रविवारी बोलाविलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. (PM Modi)
मोदी-२ सरकारच्या मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक असेल. संपूर्ण देश १८ वी लोकसभा निवडण्याच्या तयारीला लागला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्या रविवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलाविली आहे. सरकारची ही शेवटची बैठक असल्यामुळे उद्याच्या बैठकीत कोणता महत्वाचा निर्णय घेतला जाणार आहे? असा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे. पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) उद्याच्या बैठकीत सर्व केंद्रीय मंत्री आणि सर्व मंत्रालयाच्या सचिवांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे. ही बैठक उद्या सकाळी सुरू होणार असून सायंकाळी उशीरापर्यंत चालणार आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत चालणाऱ्या मॅराथॉन बैठकीत कोणकोणत्या विषयावर चर्चा होणार? आणि कोणते निर्णय घेतले जाणार? हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना लागून आहे. (PM Modi)
(हेही वाचा – Jon Bon Jovi : प्रसिद्ध अमेरिकन सिंगर जॉन बॉन जोवी)
मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष लागून असण्याचे आणखी एक कारण म्हणजे, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी. भाजप या बैठकीनंतरच आपल्या उमेदवारांची पहिली यादी जारी करणार असल्याची चर्चा आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह बडे नेते आणि २०१९ मध्ये ज्या जागांवर पराभव झाला होता त्या जागेवरील उमेदवारांची नावे पहिल्या यादीत असण्याची शक्यता आहे. भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी विविध राज्यांच्या तयारीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. अशात, आयोगाकडून कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते. (PM Modi)
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=-1HtkltFCD4
Join Our WhatsApp Community