Gautam Gambhir कडून राजकीय संन्यासाची घोषणा; क्रिकेट करिअरवर करणार लक्ष केंद्रीत

गंभीरची राजकीय कारकीर्द सुमारे पाच वर्षे चालली. २२ मार्च २०१९ रोजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पूर्व दिल्ली मतदारसंघातून विजय.

219
Gautam Gambhir कडून राजकीय संन्यासाची घोषणा; क्रिकेट करिअरवर करणार लक्ष केंद्रीत

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा भाजपा खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये त्याने ही माहिती दिली आहे.

(हेही वाचा – Ajit Pawar : काम करायचे तर एक नंबर, नाहीतर भानगडीतच पडायचे नाही; शरद पवारांच्या उपस्थित अजित पवार असे का म्हणाले?)

क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार :

राजकारण सोडून क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे गौतम गंभीरने (Gautam Gambhir) म्हटले आहे. गौतम गंभीरने जे पी नड्डा यांना सांगितले की, त्यांना आता निवडणूक लढवायची नाही. जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा आभारी आहे. जय हिंद.’

गौतम गंभीरची राजकीय कारकीर्द :

गंभीरची (Gautam Gambhir) राजकीय कारकीर्द सुमारे पाच वर्षे चालली. २२ मार्च २०१९ रोजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पूर्व दिल्ली मतदारसंघातून विजय. गंभीरकडून काँग्रेसचे उमेदवार अरविंदर सिंह लवली यांचा ३.९० लाख मतांनी पराभव. गंभीरने पहिल्यांदाच ही निवडणूक लढवली आणि त्यात तो विजयी झाला.

(हेही वाचा – PM Modi : मोदी मंत्रिमंडळाची रविवारी शेवटची बैठक )

गंभीरने (Gautam Gambhir) २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तेव्हापासून ते ट्विटरच्या माध्यमातून लष्कर, सैनिक आणि इतर सामाजिक विषयांवर आपली मते व्यक्त करतात. मात्र गौतम गंभीरने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय तज्ज्ञांनाही थोडे आश्चर्य वाटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.