Bangalore Blast : कॅफे स्फोट प्रकरणी चौघे ताब्यात

रामेश्वर कॅफेमध्ये शुक्रवारी दुपारी झालेल्या आयईडी स्फोटाचा तपास वेगाने सुरू आहे. अनेक पथके याचा तपास करत असून काही पुरावेही मिळाले आहेत. बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटात १० जण जखमी झाले आहेत. प्रकरणाची संवेदनशीलता आणि सुरक्षेची चिंता लक्षात घेऊन पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

331
Bangalore Blast : कॅफे स्फोट प्रकरणी चौघे ताब्यात

कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळुरू शहरातील कॅफेमध्ये शुक्रवार १ मार्च रोजी दुपारी झालेला स्फोट (Bangalore Blast) आईडी ब्लास्ट असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. स्थानिक रामेश्वरम कॅफेत झालेल्या या स्फोटात आतापर्यंत १० जण जखमी झाले असून त्यापैकी ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कर्नाटक पोलिसांनी दिली आहे.

(हेही वाचा – Gautam Gambhir कडून राजकीय संन्यासाची घोषणा; क्रिकेट करिअरवर करणार लक्ष केंद्रीत)

पोलिसांकडून ४ जण त्याब्यात :

अशातच याप्रकरणी शनिवारी (२ मार्च) ४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. केंद्रीय गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. याच पथकाने धारवाड, हुबळी आणि बंगळुरू येथून ४ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (Bangalore Blast)

बंगळुरूचे पोलिस आयुक्त बी. दयानंद यांनी सांगितले की,

रामेश्वर कॅफेमध्ये (Bangalore Blast) शुक्रवारी दुपारी झालेल्या आयईडी स्फोटाचा तपास वेगाने सुरू आहे. अनेक पथके याचा तपास करत असून काही पुरावेही मिळाले आहेत. बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटात १० जण जखमी झाले आहेत. प्रकरणाची संवेदनशीलता आणि सुरक्षेची चिंता लक्षात घेऊन पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, राज्यभरात विशेषत: केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या स्फोटाप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) आणि स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : बारामती शहर राज्यासाठी विकासाचं मॉडेल ठरेल)

घटनेचा सीसीटीव्ही फुटेज वायरल :

या बॉम्बस्फोटाचे (Bangalore Blast) सीसीटीव्ही फुटेजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एकदा स्फोटही झाला आहे. स्फोटानंतर लोक घटनास्थळावरून पळताना दिसत आहेत. स्फोटाबाबत पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. हा स्फोट घडवण्यासाठी एका छोट्या इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईसचा वापर करण्यात आला होता. हा कमी तीव्रतेचा स्फोट होता. बाराच्या सुमारास एक तरुण कॅफेमध्ये आला. त्याने कॅफेमध्ये एक छोटी बॅग सोडली. तासाभरानंतर बॅगचा स्फोट झाला. 28 ते 30 वयोगटातील एका तरुणाने रवा इडली खाण्यासाठी काउंटरवरून टोकन घेतले. पण, त्याने इडली खाल्ली नाही. त्याने छोटी बॅग तिथेच सोडली. तासाभरानंतर स्फोट झाला. तपास यंत्रणा आरोपींचा शोध घेत असून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.