मुंबईत सर्वाधिक अनधिकृत बांधकाम झालेल्या महापालिकेच्या बी विभागातील महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी हाती पाण्याचा पाईप घेत रस्त्यांची स्वच्छता केली. परंतु ही स्वच्छता मोहीम राबवताना येथील अनधिकृत बांधकामांकडे महापालिका आयुक्तांचे लक्ष गेले नसून रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या इक्बालसिंह चहल यांना वाढीव आणि अनधिकृत बांधकाम साफ करून येथील अतिक्रमणांची सफाई करण्याची हिंमतही दाखवली नाही. मुंबईत जिथे-जिथे लोंबकळणाऱ्या वाहिन्या (केबल) आढळतील त्या काढण्याचे तसेच नियमितपणे सखोल स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश देणाऱ्या आयुक्तांना या विभागातील अतिक्रमण हटवण्याचे आणि त्याचे नेतृत्व मी करतो असेही सांगण्याची हिंमत दाखवता आलेली नाही. (Deep Cleaning)
संपूर्ण २२७ प्रभागांमध्ये ही मोहीम पोहोचणार
मुंबई महानगरात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार गत १४ आठवड्यांपासून सखोल स्वच्छता मोहीम (Deep Cleaning) सुरू आहे. या मोहिमेला व्यापक स्वरुप देत दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. पुढील सात ते आठ आठवड्यांत संपूर्ण २२७ प्रभागांमध्ये ही मोहीम पोहोचणार आहे. सखोल स्वच्छता मोहीम अंतर्गत २ मार्च २०२४ रोजी सर्व २५ प्रशासकीय विभागात (वॉर्ड) लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. (Deep Cleaning)
स्वच्छतेचा संदेश देणारे पथनाट्य
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल यांनी सकाळी ७.३० वाजेपासून सखोल स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे, सहायक आयुक्त (बी विभाग) उद्धव चंदनशिवे, सहायक आयुक्त (ए विभाग) जयदीप मोरे यांच्यासह बी विभागातील जनाबाई रोकडे शाळेच्या विद्यार्थ्यांनी, विविध सामाजिक संस्था आणि परिसरातील नागरिकांनीदेखील उत्स्फूर्त सहभाग घेतला. ‘क्रॉस फिट’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छतेचा संदेश देणारे पथनाट्य सादर केले. (Deep Cleaning)
(हेही वाचा – Ration Grain Scam: स्वस्त धान्य घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांसह ७ जणांना २ वर्षांची शिक्षा)
जनाबाई रोकडे शाळेतील विद्यार्थ्यांशीही संवाद
महापालिका आयुक्त चहल यांनी मशीद परिसरातील काझी सईद मार्ग, रघुनाथ महाराज मंदीर, जंजीकर मार्गाची स्वच्छता केली. त्याचप्रमाणे सार्वजनिक प्रसाधनगृहांच्या स्वच्छता, निर्जंतुकीकरण कार्यवाहीची तपासणी केली. मुंबईत जिथे-जिथे लोंबकळणाऱ्या वाहिन्या (केबल) आढळतील त्या काढण्याचे तसेच नियमितपणे सखोल स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. येथील जनाबाई रोकडे शाळेतील विद्यार्थ्यांशीही चहल यांनी संवाद साधला. चहल यांनी मशीद परिसरातील वाहतूक बेटात साकारण्यात आलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शिल्पाकृतीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. (Deep Cleaning)
काही दिवसांपूर्वी भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी महापालिकेच्या बी विभागातील मशिद बंदर परिसरात पाच मजली इमारत ही ९ माळ्यांची अनधिकृत उभी राहिलेली असून या वाढीव मजल्यांच्या घरांमध्ये घुसखोरी झाल्याचा आरोप केला होता. (Deep Cleaning)
म्हाडा आणि महापालिकेचा ताळमेळ नाही
नितेश राणे यांनी केलेली इमारत ही म्हाडाची उपकरप्राप्त इमारत असून अशाप्रकारे या बी विभाग कार्यालयाच्या हद्दीत अनधिकृत बांधकामे मोठ्याप्रमाणात झालेली आहे. दुकानांसह इतर जागांवर अतिक्रमणे झाली असून दाटीवाटीने असलेल्या या भागातील अतिक्रमणामुळे लोकांना श्वास घेणेही कठीण होऊन गेले आहे. कुणीही तक्रार करू शकत नाही आणि तक्रार केली तरी त्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे निदान स्वच्छतेसाठी महापालिका आयुक्त आज मशीद बंदर परिसरात गेले होते, तर त्यांनी रस्त्यांसह या भागातील वाढीव आणि अनधिकृत बांधकामांची साफसफाई केली असती तर लोकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळू शकता असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. म्हाडा आणि महापालिकेचा ताळमेळ नसून म्हाडा महापालिकेच्या अंगावर आणि महापालिका म्हाडाच्या अंगावर जबाबदारी ढकलून टोलवाटोलवी करत असते. त्यातूनच ही अनधिकृत बांधकामे या विभागात अधिक फोफावली असून कुणालाही महापालिका आणि म्हाडा तसेच पोलिसांची भीती राहिलेली नाही, असे येथील रहिवाशी खासगीत बोलत आहेत. (Deep Cleaning)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community