पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या मॅरेथॉन बैठकीनंतर भारतीय जनता पक्षाने शनिवार २ मार्च रोजी १९५ लोकसभा उमेदवारांची (Lok Sabha 2024) पहिली यादी जाहीर केली. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून निवडणूक लढणार आहेत. तर स्मृती इराणी अमेठी मधून निवडणूक लढवणार आहेत. या यादीत केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यासह ३४ मंत्र्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र मधून एकही उमेदवार नाही :
तर महाराष्ट्र मधून एकाही जागेवर उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव देखील आजच्या यादीत जाहीर करण्यात आले नाही.
(हेही वाचा – Bangalore Blast : कॅफे स्फोट प्रकरणी चौघे ताब्यात)
गेल्या वेळी जिंकू न शकलेल्या उमेदवारांना (Lok Sabha 2024) प्रचारासाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल याची खात्री करण्याचा निर्णय सत्ताधारी पक्षाने बैठकीत घेतला होता. उत्तर प्रदेशातील भाजपचे सरचिटणीस सुनील बन्सल गेल्या वेळी गमावलेल्या जागांकडे अधिक लक्ष देत आहेत, असे एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. या मतदारसंघांमध्ये पक्षाचा विजय अपेक्षित आहे.
अरुणाचल प्रदेशात दोन जागा :
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने (Lok Sabha 2024) अरुणाचल प्रदेशातील दोन जागांसाठी किरेन रिजीजू आणि तापिर गाव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. भाजपाने १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत २८ महिला आणि ४७ युवा नेत्यांची नावे जाहीर केली आहेत. पहिल्या यादीत भाजपाने उत्तर प्रदेशातील ५१, पश्चिम बंगालमधील २०, दिल्लीतील पाच आणि आसाममधील एका जागेसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे.
We’re set to announce candidates on 51 seats from Uttar Pradesh, 20 from West Bengal, 24 from Madhya Pradesh, 15 each from Gujarat and Rajasthan, 12 from Kerala, 9 seats from Telangana, 11 from Assam, 11 each from Jharkhand and Chhattisgarh, 5 from Delhi, 2 from J&K, 3 from… pic.twitter.com/hUa5jyOjng
— BJP (@BJP4India) March 2, 2024
दिल्ली उमेदवार :
मनोज तिवारी ईशान्य दिल्लीसाठी, बांसुरी स्वराज नवी दिल्लीसाठी पश्चिम दिल्ली-कमलजीत सहरावत; दक्षिण दिल्ली-रामवीर सिंग बिधूडी आणि दिल्ली चांदनी चौक-प्रवीण खंडेलवाल यांच्या नावांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Lok Sabha 2024)
(हेही वाचा – CM eknath shinde : कष्टकरी, शेतकऱ्यांना सुखी आणि संपन्न कर, आई भराडी देवी चरणी मुख्यमंत्र्यांचे साकडे)
भाजपाची पहिली यादी पुढीलप्रमाणे :
पश्चिम बंगाल – २० जागा, मध्य प्रदेश – २४ जागा, गुजरात – १५ जागा, राजस्थान – १५ जागा, केरळ -१२ जागा, तेलंगणा – ९ जागा, आसाम – ११ जागा, झारखंड – ११ जागा, छत्तीसगड – ११ जागा, दिल्ली- ५ जागा. (Lok Sabha 2024)
मतदारसंघ आणि उमेदवार :
अरुणाचल पश्चिम मतदारसंघ – किरेन रिजीजू
दिब्रुगडमधून – सर्वानंद सोनोवाल
ईशान्य दिल्ली – मनोज तिवारी
नवी दिल्ली – बांसुरी स्वराज
गांधीनगर – अमित शहा
पोरबंदर – मनसुख मांडविया
नवसारी – सी. आर. पाटील
गोड्डा – निशिकांत दुबे
अमेठी – स्मृती इराणी
मथुरा – हेमा मालिनी
इतर प्रमुख नावांमध्ये त्रिशूरचे सुरेश गोपी, पठाणमथिट्टाचे अनिल अँटनी, तिरुवनंतपुरमचे राजीव चंद्रशेखर, गुनाचे ज्योतिरादित्य सिंधिया, विदिशाचे शिवराज सिंह चौहान, बिकानेरचे अर्जुन मेघवाल, अलवरचे भूपेंद्र यादव, जोधपूरचे गजेंद्र सिंह शेखावत, कोटाचे ओम बिर्ला यांचा समावेश आहे. करीमनगरमधून संजय कुमार आणि सिकंदराबादमधून जी. किशन रेड्डी. (Lok Sabha 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community