- ऋजुता लुकतुके
कोरोना नंतरच्या काळात देशात ऑनलाईन अर्थव्यवहारांमध्ये वाढ झालीच आहे. आता ही आकडेवारी दरवर्षी नवनवीन विक्रम करताना दिसते आहे. २९ फेब्रुवारीच्या दिवशी देशभरात नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर अर्थात एनईएफटीच्या माध्यमातून तब्बल ४.१ कोटी व्यवहार झाले. एनईएफटी हे दोन बँक खात्यांमध्ये ऑनलाईन पैसे हस्तांतरित करण्याचं एक माध्यम आहे. (Record NEFT Transactions)
ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही हा व्यवहार करू शकता आणि रिझर्व्ह बँकेचं या व्यवहारांवर नियंत्रण असतं. त्यामुळे हा पैसे हस्तांतरणाचा हा सुरक्षित पर्याय आहे. एनईएफटी बरोबरच रिअलटाईम ग्रॉस सेटलमेंट अर्थात, आरटीजीएसचाही वापर बँक ग्राहकांकडून केला जातो. पण, आरटीजीएस साठी माफक का होईना शुल्क आकारलं जातं. कारण, इथं पैसे हस्तांतरित होत असतानाच त्याची बँक खात्यांमधून सेटलमेंट होते. (Record NEFT Transactions)
(हेही वाचा – Crime: पिंपरी-चिंचवड शहरात ४५ कोटींच्या ड्रग्ससह पोलीस फौजदाराला अटक)
एनईएफटीमधून पैसे वळते होण्यासाठी काही तास जातात. रिझर्व्ह बँकेनं अलीकडेच एका अहवालात एनईएफटी आणि आरटीजीएस प्रणालींचा वापर वाढल्याचं म्हटलं आहे. २०१४ पासून पुढील १० वर्षांत एनईएफटी व्यवहारांचं प्रमाण ७०० टक्क्यांनी तर आरटीजीएस वापराचं प्रमाण २०० टक्क्यांनी वाढल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. व्यवहारांच्या संख्येबरोबरच एकूण हस्तांतरित निधीचा आकडाही वाढतो आहे. आरटीजीएस प्रणालीचा वापर करून ३१ मार्च २०२३ रोजी १६.२५ लाखांचे व्यवहार एका दिवसांत झाले होते. हा अजूनही एक उच्चांक आहे. (Record NEFT Transactions)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community