राज्यातील भाजपा-शिवसेना (शिंदे)-राष्ट्रवारी काँग्रेस (अजित पवार) महायुतीमध्ये भाजपा किमान ३२-३३ जागांवर उमेदवार देण्याची शक्यता असून ९-१० जागांवर शिवसेना (Shiv Sena) आणि ५-६ जागा राष्ट्रवादी (NCP) पक्षाला सोडण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यामुळे शिवसेना (Shiv Sena) गोटात नाराजीचा सूर असून १८ पैकी १३ खासदारांनी उद्धव ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’ करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे. (Mahayuti)
शिवसेनेने २२ जागा लढल्या
गेल्या २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत, राज्यातील एकूण ४८ लोकसभा जागांपैकी २२ जागा शिवसेनेने (Shiv Sena) लढवल्या, त्यात १८ उमेदवार निवडून आले. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ४० आमदार आणि १२ खासदार शिंदे यांच्यासोबत राहिले. मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनीही चार महिन्यानंतर ठाकरे यांची साथ सोडत नोव्हेंबर २०२२ मध्ये शिंदे यांच्या गोटात प्रवेश केला. (Mahayuti)
राष्ट्रवादीमुळे शिवसेनेची गणिते बदलली
आता लोकसभेला सामोरे जातांना शिवसेना (Shiv Sena) खासदारांना वाढीव नाही पण किमान विद्यमान खासदारांना तरी महायुतीतून निवडणूक लढण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा होती. काहीनी तर २२ जागांची मागणी केली कारण गेल्या २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेने २२ जागा लढवल्या होत्या. मात्र आता परिस्थिती बदलली असून राष्ट्रवादी (NCP) हा मोठा मित्र महायुतीत सामील झाल्याने शिवसेनेला अभिप्रेत असलेले चित्र आणि गणिते बदलली. (Mahayuti)
(हेही वाचा – Police Transfer Maharashtra : कार्यकाळ पूर्ण होऊन देखील जिल्ह्याबाहेर बदल्या नाही)
विधानसभा निवडणुकीत भरपाई?
अशातच भाजपाची ताकद देशभरात वाढत असून मूळ शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) शकले उडाली आणि काँग्रेसला गळती लागली. अशा परिस्थितीत भाजपाने कमी जागा दिल्या तरी वेगळे लढण्याचा पर्याय कुठल्याही पक्षाकडे नाही, याची कल्पना दोन्ही पक्षाच्या बड्या नेत्यांना आहे. फार तर विधानसभा निवडणुकीत याची भरपाई करण्याची संधी मिळेल, इतकी काय ती अपेक्षा महायुतीतील दोन्ही पक्ष करू शकतात, असे एका शिवसेना (Shiv Sena) आमदाराने सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील (NCP) किमान ४ आणि अधिकाधिक सहा जागांची अपेक्षा धरली असल्याचे कळते. (Mahayuti)
यशाची शाश्वती अधिक
शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीला (NCP) भाजपाच्या तुलनेत कमी जागा मिळाल्या तरी यशाची शाश्वती अधिक आहे. म्हणजे १५ जागा लढून ५ निवडून येण्यापेक्षा १० लढून ८ निवडून आणण्याची क्षमता या महायुतीत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Mahayuti)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community