पुणे पोलिसांनी (Crime) पुणे, दिल्ली, कुरकुंभ, सांगली परिसरात छापे टाकून ३ हजार ६०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. आरोपींच्या चौकशीत मेफेड्रोन तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची माहिती मिळाली. या प्रकरणात अटक केलेल्या एका आरोपीने कच्चा माल विश्रांतवाडीत एका टेम्पोत लपवून ठेवल्याचे तपासात उघडकीस आल्यानंतर शनिवारी गुन्हे शाखेच्या पथकाने ३४० किलो कच्चा माल जप्त केला आहे.
यात रासायनिक पदार्थांचा समावेश असून, त्याचा वापर मेफेड्रोन, मेथ असे अमली पदार्थ तयार करण्यासाठी केला जात असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Commissioner of Police Amitesh Kumar) यांनी सांगितले. गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी छापा टाकला. तेथे एका टेम्पोत लपवून ठेवण्यात आलेला कच्चा माल जप्त करण्यात आला असून, कच्चा माल तपासणीसाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवून देण्यात येणार आहे.तपासणीनंतर कच्च्या मालातील रासायनिक पदार्थांची माहिती मिळणार आहे, असे पोलीस आयुक्तांनी नमूद केले.
मेफेड्रोन तस्करी देश-परदेशात करण्यात आली. पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत एका कारखान्यात मेफेड्रोन तयार केले जात होते. तेथे छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून, मेफेड्रोन तस्करीचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया परदेशात पसार झाल्याची माहिती मिळाली आहे.
मेफेड्रोन विक्री प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची चौकशी करण्यात आली. तेव्हा आरोपींनी मेफेड्रोन तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल विश्रांतवाडीतील एका टेम्पोत लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे छापा टाकून ३४० किलो कच्चा माल जप्त केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community