विवाहबाह्य संबंध असलेल्या मुसलमानाने पत्नीला दिला Triple Talaq; पतीवर गुन्हा दाखल

273
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुसलमान महिलांवर ट्रिपल तलाकच्या (Triple Talaq) माध्यमातून अन्याय होतो, त्यामुळे हे प्रथा बंद करण्यात आली आहे. असे असतानाही पनवेल येथे विवाहबाह्य संबंध असलेल्या मुसलमानाने पत्नीच्या कार्यालयात जाऊन ओळखीचे लोक हजर असताना अचानक तलाक, तलाक, तलाक असे तीनवेळा बोलून तात्काळ तलाक (Triple Talaq) दिला. या प्रकरणी पत्नीने पतीविरोधात (वय ४३) मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण अधिनियम २०१९ कलम चार प्रमाणे खारघर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

या मुसलमानासोबत एक काझी, दोन इस्लामी वकील व साक्षीदारही होते. तेथेच पतीने, “ही माझी पत्नी असून मी तुम्हा सर्वांना साक्षी ठेवून हिला तलाक देतो. असे बोलून “तलाक तलाक तलाक” (Triple Talaq) असे बोलून तत्काळ तलाक दिला. त्यानंतर महिलेने कायदेशीर मार्गदर्शन व माहिती घेऊन पतीविरोधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने तपास सुरु के ला आहे. संबंधित मुस्लिम महिला तळोजा फेज-१ येथे पती आणि मुलांसह राहते. तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेची विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय संबंधित महिलेला होता. याबाबत तिने पतीकडे विचारणा केली असता पतीकडून पत्नीला मारहाण  होऊ लागली. तसेच चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक त्रास देण्यात येऊ लागला. त्यानंतर पीडित महिलेने सीबीडी बेलापूर पोलीस स्थानकात पतीविरोधात तक्रार अर्ज दिला. त्यानंतर या प्रकरणाची महिला सहाय्यता कक्षात समुपदेशनाची सुनावणीही चालू होती.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.