Alphonso Mango : ११ दिवसांत हापूसच्या १.८ लाख पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल; २० टक्के आंबा विदेशात रवाना

216
कोकण हापूस आंब्याची (Alphonso Mango) परदेशवारी गेल्या तीन दिवसांपासून सुरू झाली असून, गेल्या ११ दिवसांत मुंबईतून कोकण हापूसच्या ५८ हजार ७४६ पेट्या, तर परप्रांतीय हापूसच्या ४९ हजार ५०९ पेट्या अशा एकूण १ लाख ८ हजार २२५ पेट्या एपीएमसीत दाखल झाल्या. यातील २० टक्के हापूस म्हणजे रोज दोन हजार पेट्या सागरी मार्गे परदेशवारीला जात आहे. २९ जानेवारीला कोकण हापूसच्या ३६० पेट्या सर्वप्रथम दाखल झाल्या.

हापूसची परदेशवारी सागरी मार्गाने  

रत्नागिरी, देवगड, राजापूर, बाणकोट, वेंगुर्ला, मालवण येथून हापूसची आवक फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू झाली. कोकण हापूसची मुंबईवारी खऱ्याअर्थाने १५ फेब्रुवारीपासून सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र यंदा १८ दिवस आधीच कोकण हापूस एपीएमसीत दाखल झाला. १९ फेब्रुवारीपासून ५ ते ७ हजार पेट्यांची (Alphonso Mango) आवक नियमित सुरू झाली. रोज १५०० ते २००० पेट्यांची परदेशवारी सुरु झाली आहे. एकूण आवकच्या १५ ते २० टक्के हापूस आखाती देशात निर्यात केला जात आहे. हवाई मार्गाचा खर्च अधिक असल्याने हापूसची परदेशवारी ही सागरी मागनि केली जात आहे. निर्यात होणा होणाऱ्या हापूसचे स्कॅनिंग केले जाते. डागी आंबा बाजू‌ला काढून ठेवला जातो. एकाच प्रतीचा, वजनाचा आणि आकाराचा हापूस निर्यातीसाठी पाठवला जातो. दरवर्षी आलेल्या मालाची छाननी करूनच निर्यातीचा माल निश्चित केला जातो.

सर्वसामान्यांना १५ एप्रिलनंतर हापूसची चव चाखता येईल.

सध्या ५ ते १२ हजार रुपयांचा दर पेटीला मिळत असून, १५ मार्चपासून हापूसचा हंगाम मोठ्या प्रमाणावर सुरू होईल. ३० मार्चनंतर दररोज किमान ३ ते साडेतीन लाख पेट्या कोकण हापूसची आवक एपीएमसीत सुरू होईल, सर्वसामान्यांना १५ एप्रिलनंतर हापूसची (Alphonso Mango) चव चाखता येईल. एप्रिलमध्ये हापूसचे दर ५ ते ७ हजार रुपये पेटीपर्यंत येऊ शकतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली, तर मेमध्ये दर १५ ते ३००० रुपये पेटी असतील, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले. कोकण हापूसची आतापर्यंत ५८ हजार ७४६ पेट्यांची, तर परराज्यातून ४९ हजार ५०९ पेट्यांची आवक झाली. १५ मार्चनंतर हापूसच्या निर्यातीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.