Andhra Pradesh Railway Accident : आंध्र प्रदेशातील २०२३ मध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामागील धक्कादायक कारण आले समोर…

358
आंध्र प्रदेशमध्ये २९ ऑक्टोबर २०२३ रोजी दोन पॅसेंजर ट्रेनची धडक (Andhra Pradesh Railway Accident) झाली होती. या भीषण अपघातात १४ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. हा अपघात का झाला होता, याचे धक्कादायक कारण केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. जेव्हा हा अपघात झाला तेव्हा पॅसेंजर ट्रेनचा चालक आणि सहचालक हे अपघात होण्यापूर्वी मोबाईलवर क्रिकेट सामना पाहत होते. शनिवारी या अपघातासंदर्भात माहिती देताना मंत्री वैष्णव यांनी हा धक्कादायक खुलासा केला.

50 हून अधिक प्रवाशी जखमी झाले

आंध्र प्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्यातील कंटकपल्ली येथे हावडा-चेन्नई रेल्वे लाईनवर रायगड पॅसेंजर ट्रेनने विशाखापट्टनम पलासा ट्रेनला मागून धडक दिली होती. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला, ज्यामध्ये ५० हून अधिक प्रवाशी जखमी झाले होते. भारतीय रेल्वे आता नवीन सुरक्षा उपायांवर काम करत आहे. त्याबद्दल माहिती देत असताना मंत्री वैष्णव यांनी आंध्रप्रदेशमध्ये मागच्यावर्षी घडलेल्या अपघाताचा (Andhra Pradesh Railway Accident) उल्लेख केला. ते म्हणाले, आंध्र प्रदेशमध्ये जो अपघात घडला त्याच्यामागे लोको पायलट आणि सह-पायलट दोघेही मोबाईलवर क्रिकेटचा सामना पाहत होते, म्हणून त्यांचे लक्ष विचलित झाले. आता रेल्वेमध्ये आम्ही अशी प्रणाली बसवत आहोत, ज्यामुळे अशा चुकांचा आम्ही शोध घेऊ शकू. पायलट आणि सह-पायलट दोघेही फक्त रेल्वे चालविण्यावरच लक्ष केंद्रीत करतील, यावर यापुढच्या काळात अधिक भर दिला जाणार आहे.

अपघातानंतर आम्ही खोलात जाऊन त्याची चौकशी करतो 

वैष्णव पुढे म्हणाले की, आम्ही सुरक्षेवर अधिक भर देत आहोत. प्रत्येक अपघातानंतर आम्ही खोलात जाऊन त्याची चौकशी करत आहोत. अपघाताचे (Andhra Pradesh Railway Accident) कारण शोधल्यानंतर पुढच्या वेळेस या कारणामुळे अपघात होऊ नये, म्हणून त्यावर उपाय शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे. आंध्रप्रदेशमध्ये अपघात झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीआरएस) केलेल्या तपासणीचा अहवाल अद्याप सार्वजनिक केलेला नाही. अपघाताच्या दुसऱ्या दिवशी प्राथमिक तपासात रायगड पॅसेंजर ट्रेनच्या पायलट आणि सह पायलटला अपघातासाठी जबाबदार धरले होते. त्यांनी दोन सिग्नल ओलांडले असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या अपघातामध्ये दोघांचाही मृत्यू झाला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.