कल्याण आणि डोंबिवली या भागाला आता थेट नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईशी जोडणाऱ्या कल्याण तळोजा मेट्रो 12 (Metro Line 12) च्या कामालाही गती मिळणार आहे. मेट्रो 12 चे काम जलद गतीने सुरू असून या मार्गाचे रविवार, ३ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.
ठाणे ते कल्याण वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून नागरिकांना वाहतूक कोंडीमुक्त आणि जलद प्रवासासाठी सातत्याने नवनवीन प्रकल्पांना प्राधान्य देतात. मुंबईसह ठाणे पल्याडची कल्याण, डोंबिवली ही शहरे मेट्रो मार्गाने जोडून त्यांना वाहतुकीची नवी साधने उपलब्ध करून देण्याच्या हेतूने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध मेट्रो मार्गांची उभारणी केली जाते आहे. या मार्गांमुळे लवकरच या भागातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. ठाणे –भिवंडी–कल्याण या मेट्रो मार्गाचा विस्तारीत भाग असलेल्या कल्याण–डोंबिवली–तळोजा मेट्रो 12 (Metro Line 12) हा मार्ग महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.
(हेही वाचा Mohammad Gaus : संघाचे नेते रुद्रेश यांची हत्या करणारा दहशवादी महंमद गौसला दक्षिण आफ्रिकेत अटक)
अशी आहे मेट्रो 12
कल्याण तळोजा ही मेट्रो मार्गिका (Metro Line 12) ठाणे- भिवंडी- कल्याण या मेट्रो मार्गिकेला जोडली जाणार आहे. त्यामुळे ठाणे ते तळोजा हे कल्याणमार्गे अंतर सहजरित्या कापता येणार आहे. हा मार्ग एकूण 20.75 किलोमीटर लांबीचा यात 17 मेट्रो स्थानके असणार आहेत. कल्याण पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समितीपासूनहा मार्ग सुरू होणार आहे. तर पुढे डोंबिवलीतील विविध गावे आणि मानपाडा मार्गे कल्याणच्या ग्रामीणभागातून हा मेट्रो मार्ग जाणार आहे. तळोजा हे या मार्गातील अंतिम स्थानक आहे. या मार्गामुळे शहरी भागासहग्रामीण भागही मेट्रोला जोडला जाणार आहे.
Join Our WhatsApp Community