भाजपाने देशातच नव्हे, तर परदेशातही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमेरिकास्थित ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी (OFBJP)ने भाजपाला तिसऱ्यांदा विजय मिळवून देण्याचे काम हाती घेतले आहे. OFBJPकडून भारतात २५ लाख कॉल केले जातील. यामध्ये त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन करण्यास सांगितले जाईल.
अमेरिकेतील ओएफबीजेपीचे अध्यक्ष अडापा प्रसाद यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही शनिवारी मेरीलँडमध्ये बैठकही घेतली आहे. भारतातील भाजपच्या विजयाला आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ, असा निर्धार करण्यात आला. या कार्यक्रमात OFBJPचे 100 प्रमुख सदस्य सहभागी झाले होते.
(हेही वाचा – Dr. Harsh Vardhan : लोकसभेचे तिकिट कापल्यानंतर माजी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची राजकारणातून निवृत्ती जाहीर)
भाजपने शनिवारी 2 मार्च रोजी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मध्य प्रदेशचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले शिवराज सिंह चौहान यांची नावे आहेत. निवडणूक आयोग येत्या १५ दिवसांत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो. एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.
भारतातील अनेक राज्यांवर चर्चा
OFBJPमधील भारतीय-अमेरिकन कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, पंजाब, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यासारख्या अनेक राज्यांचे विश्लेषण सादर केले. ADPA नुसार, आम्ही अनेक भारतीय राज्यांचा आढावा घेतला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीचे सादरीकरण केले. OFBJPने भारतात लोकसभा निवडणुकीसाठी 3 हजार स्वयंसेवक तैनात केले आहेत. सोशल मीडिया, फोन कॉल्स, मतदारांचे विश्लेषण, प्रचार आणि भारत दौरा अशा कामांमध्ये या सर्वांचा सहभाग असेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community