केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या (Maharashtra) दौऱ्यावर येत आहेत. (Lok Sabha Election 2024) या दौऱ्यामध्ये महायुतीच्या जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरातील १५० लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यानंतर पुढच्या टप्प्यातील उमेदवारांची यादीदेखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश पहिल्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर पुढील यादीत महाराष्ट्रातील काही उमेदवार जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादृष्टीने महायुतीतील जागा वाटपाचा अंतिम निर्णय अमित शहा यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार
अमित शहा हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्या दौऱ्यावर येणार आहेत. यापूर्वीदेखील त्यांचा दौरा तसेच सभे नियोजन करण्यात आले होते, मात्र दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा अचानक रद्द करण्यात आला होता. आता 4 आणि 5 मार्च रोजी अमित शहा हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येणार आहेत तसेच या दरम्यान ते अकोला आणि जळगाव येथेदेखील दौरा करणार आहेत. या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार अमित शहा हे करणार असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा हे सोमवार आणि मंगळवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा दौरा कसा असेल?
सोमवारी दि.4 मार्चला रात्री 10 वा. 10 मि. नी. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व हॉटेल राम इंटरनॅशनल कडे रवाना व मुक्काम. मंगळवार दि. 5 रोजी सकाळी सव्वा दहा वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथून हेलिकॉप्टरने अकोलाकडे रवाना. अकोला व जळगाव येथील नियोजित कार्यक्रम आटोपून सायं. 5 वा. 40 मि. नी छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे हेलिकॉप्टरने आगमन व हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे आगमन व राखीव. सायं. 6 वा. 10 मि. नी. हॉटेल रामा इंटरनॅशनल येथून मोटारीने क्रांती चौक कडे प्रयाण, क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण, तेथून मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान, खडकेश्वरकडे प्रयाण, सायं. 6 वा. 35 मि. नी जाहीर सभेस उपस्थिती व संबोधन. सायंकाळी साडेसात वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावरुन मोटारीने छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण, सायंकाळी पावणे आठ वाजता ते विमानाने मुंबईकडे रवाना होतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community