National Security Day : सुरक्षा हा आपला अधिकार आहे आणि तो आपण मिळवलाच पाहिजे!

ब-याचदा आपण सुरक्षेविषयी जागरुक नसतो. आपले अधिकार काय आहेत हे देखील आपल्याला माहित नसतात. तुम्ही रस्ता ओलांडत असाल, तुम्ही रेल्वे ट्रॅक ओलांडत असाल, तर तिथे सुद्धा सुरक्षा हवी. तुमचे प्रत्येक कार्य सुरक्षितपणे झाले पाहिजे. मुंबईची एक म्हण आहे, 'नजर हटी दुर्घटना घटी'. ही दुर्घटना घडू न देणे म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा.

196
National Security Day : सुरक्षा हा आपला अधिकार आहे आणि तो आपण मिळवलाच पाहिजे!
जयेश शत्रुघ्न मेस्त्री

४ मार्चला दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा (National Security Day) केला जातो. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेद्वारे ४ मार्च १९७२ पासून हा दिवस सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी साजरा केला जातो. आता सर्वात आधी आपल्याला समजून घ्यावे लागेल की सुरक्षा ही केवळ समाजकंटक किंवा अतिरेक्यांपासून मिळवायची नाही. तर प्रत्येक गोष्टीपासून सुरक्षा मिळायला हवी. त्यासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस आहे.

देशात किती तरी अपघात हलगर्जीपणामुळे होतात :

ब-याचदा आपण सुरक्षेविषयी (National Security Day) जागरुक नसतो. आपले अधिकार काय आहेत हे देखील आपल्याला माहित नसतात. तुम्ही रस्ता ओलांडत असाल, तुम्ही रेल्वे ट्रॅक ओलांडत असाल, तर तिथे सुद्धा सुरक्षा हवी. तुमचे प्रत्येक कार्य सुरक्षितपणे झाले पाहिजे. मुंबईची एक म्हण आहे, ‘नजर हटी दुर्घटना घटी’. ही दुर्घटना घडू न देणे म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा. देशात किती तरी अपघात हलगर्जीपणामुळे होत असतात. आपण ब-याचदा सिलिंडर स्फोट, आग लागल्याची दुर्घटना अशा बातम्या वाचत असतो. या घटना हलगर्जीपणामुळे, चुकीमुळे घडतात आणि या चुका कशामुळे होतात? तर जागरुकता नसल्यामुळे.

(हेही वाचा – Pravin Darekar : केवळ भाषणे देऊन, भावनिक होऊन निवडणुका जिंकता येत नाहीत)

२०१४ ला आपण मानसिकरित्या स्वतंत्र झालो असे म्हणावे लागेल :

अशा अनेक गोष्टी राष्ट्रीय सुरक्षा अंतर्गत येतात. मान्य आहे की आपल्या देशाने स्वातंत्र्य मिळवून पुष्कळ वर्षे झाली आहेत. मात्र इतकी वर्षे देशातल्या लोकांमध्ये मरगळ पसरली होती. २०१२ नंतर ती मरगळ हळूहळू दूर होऊ लागली. २०१४ ला आपण मानसिकरित्या स्वतंत्र झालो असे म्हणावे लागेल. त्यामुळे आपल्याला आता जोमाने काम करावे लागणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत सजग राहावे लागणार आहे. अधिकाधिक जीवीतहानी टाळावी हे आपले ध्येय आहे. सावरकर म्हणतात, ‘हे मिळविलेले स्वराज्य उपभोगासाठी मिळाले आहे असे समजू नका. हे तुमचे हिंदूंचे महाराज्य जर सुरक्षित नि प्रबळ करावयाचे असेल तर आणखी दहा वर्षे तरी तुम्हांस त्या स्वातंत्र्यसंपादक पिढीने केला त्याहून दसपटीने अधिक त्याग, अधिक कष्ट नि अधिक पराक्रम केला पाहिजे.’

सावरकरांचे हे विधान १६६४ सालाचे असले तरी वर म्हटल्याप्रमाणे मानसिकरित्या स्वतंत्र होऊन आपल्याला दोन दशकेच झाली आहेत. त्यामुळे पुढील दहा वर्षे आपापली वैयक्तिक कार्ये करीत असताना जमेल तसे देशकार्य करायचे आहे. सावरकर म्हणतात त्याप्रमाणे तरुणांसमोर कामाचा डोंगर पडलेला आहे आणि अशा वेळी आपण तरुण निवांत, शांत बसता कामा नये. तारुण्याचा उपभोग घेतलाच पाहिजे. पण त्या तारुण्याचा उपयोग भारतमातेची सेवा करण्यासाठी सुद्धा झाला पाहिजे. मानवाला जसा सर्वांगिण विकासाची आवश्यकता असते, तशी देशाला सर्वांगिण सुरक्षेची आवश्यकता आहे आणि तुम्ही-आम्ही मिळून ते शक्य करणार आहोत. (National Security Day)

(हेही वाचा – Dr. Harsh Vardhan : लोकसभेचे तिकिट कापल्यानंतर माजी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची राजकारणातून निवृत्ती जाहीर)

राष्ट्रीय सुरक्षा दिनाचा उद्देश काय आहे?

१. कामाच्या ठिकाणी आणि दैनंदिन जीवनात सुरक्षा
२. जागरुकता नसल्यामुळे होणारी दुर्घटना प्रतिबंधित करणे
३. देशभरात SHE चळवळ राबवणे. (SHE म्हणजे सिक्योरिटी, हेल्थ, एनव्हायर्नमेंट)
४. सर्व आजारांपासून आणि संक्रमणापासून बचाव, जसे लसीकरण इत्यादी
५. सर्व महिलांची सुरक्षा
६. औद्योगिक दुर्घटना कमी करुन सुरक्षा प्रदान करणे (National Security Day)

समर्थ रामदासांनी छत्रपती संभाजी महाराजांना ’अखंड सावधान असावे’ असा उपदेश केला होता. खरेतर हा उपदेश सर्वांनाच लागू पडतो. दैनंदिन आयुष्य जगताना आपण अखंड सावधान असले पाहिजे. कोणत्याही प्रकारचा अपघात टाळण्यासाठी आपण खबरदारी घेतली पाहिजे. (National Security Day)

(हेही वाचा – Indian Navy: भारतीय नौदलाच्या जहाजातून जम्मूचा नौसैनिक ६ दिवसांपासून बेपत्ता)

आपण कोणकोणती खबरदारी घेऊ शकतो?

१. मद्यपान करुन गाडी चालवणे, मशीन संचालित करणे टाळू शकतो.
२. तसेच धोकादायक कामे करताना फोन वापरणे, चॅटिंग करणे, खाणे, गप्पा मारणे इत्यादी कामे टाळू शकतो.
३. ओव्हरटेक करणे टाळा.
४. धोकादायक ठिकाणी जाणे टाळा.
५. तुमच्या सभोवताली लक्ष ठेवा.
६. धोकादायक कृत्ये किंवा ठिकाणे दिसली तर त्याबद्दल तक्रार करा (नाव गुप्त ठेवूनही तक्रार करता येते.)
७. अगदी वैयक्तिक सांगायचे तर आरोग्य सांभाळा. कोणताही आजार अंगावर काढू नका.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.