पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी त्यांच्या मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी ‘विकसित भारत @ २०४७’ ( Viksit Bharat @2047) च्या व्हिजनसंदर्भात चर्चा केली. यावेळी पुढील ५ वर्षांच्या कामकाजाबाबत चर्चा केली. मोदी सरकारच्या कार्यकाळातील ही शेवटची सभा होती.
देशाला विकसित देश म्हणून तयार करण्यासाठी ‘विकसित भारत@ 2047’ मोहीम राबवली जात आहे. यात आर्थिक समृद्धी, सामाजिक प्रगती तसेच प्रभावी प्रशासन यासारख्या विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. पंतप्रधानांनी देशातील युवकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना यात सक्रीयपणे सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे. राष्ट्रीय विकासासाठी व्यावसायिक, विद्यार्थी आणि मोठ्या प्रमाणात भारतातील नागरिकांना एकत्र आणण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.
(हेही वाचा – Sunil Deodhar : पुण्याचे प्रश्न सोडवण्याचा मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार)
जागतिक स्तरावर विकसित राष्ट्र…
पंतप्रधानांच्या या विकसित भारताविषयी जनजागृती करण्यासाठी प्रत्येक राज्यात आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये या योजनेअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. विकसित भारत बनवण्यासाठी अधिकाधिक नागरिकांचा या योजनेत समावेश करून घेण्यात येत आहे. जेणेकरून 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र म्हणून जागतिक स्तरावर मान्यता मिळू शकेल.
व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ, संशोधन अभ्यासकांची बैठक पहिल्यांदा दिल्लीत आयोजित करण्यात आली होती, ज्याचे नेतृत्व माहिती तंत्रज्ञान, कौशल्य आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर आणि ईएसी-पीएम सदस्य डॉ. शामिका रवी यांच्यासारख्या प्रख्यात व्यक्तींनी केले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community