Eknath Shinde: डोंबिवलीत मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात देशात महाराष्ट्र राज्य अग्रेसर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

292
Eknath Shinde: डोंबिवलीत मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
Eknath Shinde: डोंबिवलीत मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात देशात महाराष्ट्र राज्य अग्रेसर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे (Modern Maternity Home and Cancer Hospital, Dombivli) भूमिपूजन तसेच विविध विकासकामाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून ) मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे,आ. रवींद्र फाटक आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या काही वर्षांपासून ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विकास कामे शासन करत आहे. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहकार्याने अनेक उपक्रम राबविले जात आहेत यामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण तसेच विविध लोकोपयोगी उपक्रमाचा समावेश आहे.

अंबरनाथमध्ये वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून त्या ठिकाणी अधिष्ठता देखील नियुक्त करण्यात आला आहे. कळव्यातील रुग्णालयामधील कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी विभाग कॅशलेस करण्यात आलेला आहे. रेडिओलॉजी च्या माध्यमातून जे उपचार होणार आहेत ते माफक दरामध्ये देण्यात येणार असून या भागातील खासदार हे स्वतः डॉक्टर असल्यामुळे या भागातील सुविधा निर्माण करण्यासाठी ते शासनाकडे सतत पाठपुरावा करत असतात त्याबद्दल खासदार श्रीकांत शिंदे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले.

(हेही वाचा – Viksit Bharat @2047: मंत्रिमंडळ बैठकीत विकसित २०४७ च्या व्हिजनवर चर्चा, मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटची बैठक संपन्न)

महात्मा फुले जन आरोग्य अभियानाअंतर्गत यापूर्वी दीड लाखापर्यंत उपचाराची मर्यादा होती. या मर्यादेत वाढ करून आता ५ लाखांपर्यंत उपचार घेता येणार आहेत. राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित या अंतर्गत ४ कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य योजना देखील राज्यांमध्ये राबविण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दूरदृष्टी प्रणालीद्वारे पुढील विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. डोंबिवली पश्चिम येथील मासळी बाजार, डोंबिवली पूर्व येथील महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय येथील शवविच्छेदनगृह, नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU), सुनील नगर येथील अभ्यासिका या विकासकामाचा समावेश आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.