Uddhav Thackeray : अब की बार भाजपा तडीपार; उद्धव ठाकरे यांचा नारा

215

भाजपाने केवळ शहराची आणि रेल्वे स्थानकांची नावे बदलल्या पलिकडे काही केले नाही. अच्छे दिन आएगे, असाही नारा होता. पण अच्छे दिन काही आले नाहीत. तो एक जुमला होता. आता भाजपा गॅरेंटी देत आहेत. हा एक जुमलाच आहे. आमच्या खासदारामुळे गेल्यावेळी तुम्ही अडीचशेच्या पार गेला होता हे लक्षात ठेवा. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा होता. आता दिल्लीचेही तख्त फोडावे लागेल, आता अब की भाजपा तडीपार अशी घोषणा द्यावी लागेल, असे उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी धारवी येथील सभेत म्हणाले.

…तर आम्हीही तुमच्यासोबत येतो 

आठ वर्षापूर्वी सव्वा लाख कोटीचे पॅकेज मोदींनी बिहारला जाहीर केले होते. जाहीर सभेतून, त्यापैकी किती आले. आले असतील तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यासोबत येतो, असेही ते म्हणाले. आता मोदींचा फसवी फसवीचा खेळ सुरू आहे. आम्हीही दोनदा मोदींच्या भूलथापांना बळी पडलो. पदरात काय पडले? धोंडे पडले तरी त्यात त्यांना शेंदूर फासून देव करता येतो. हे काय करणार, असेही ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली.

(हेही वाचा Abhinav Bharat Society: ‘अभिनव भारत’च्या वास्तूचे सौंदर्यीकरण करताना जुन्याचा सरसकट विध्वंस गरजेचा होता का?)

गडकरी यांचे नाव पहिल्या यादीत नाही 

भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर केली. मी त्यात जाणार नाही. त्यांच्या पक्षातही जाणार नाही असे सांगत ठाकरे पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची नाव भाजपाच्या यादीत. मोदी, शाह हे नाव आम्हाला माहीत नव्हते. आम्हाला प्रमोद महाजन यांनी ओळख करून दिली. महाजन यांच्यासोबत नितीन गडकरी आले. गडकरी यांनी 55 उड्डाणपुलं बांधली. संघाचा निष्ठावंत माणूस आहे. पण त्यांचे नाव या पहिल्या यादीत नाही. मुंबईतील कृपाशंकर सिंह यांचे नाव यादीत आहे. पण गडकरींचे नाव नाही अशी टीका त्यांनी केली, असेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.