Environment : देशभरात काही ठिकाणी बर्फवृष्टी, पाऊस आणि गारपीट; हवामानात होतोय बदल

223
Department of Meteorology: पुढील २४ तासांमध्ये मुंबईत हलक्या पावसाचा अंदाज, कोकणातील पर्यटन रविवारपासून बंद

यंदा बर्फवृष्टी, पाऊस आणि गारपिटीमुळे पूर्ण हवामान (Environment) बदलले आहे. शनिवारी देशातील ८ राज्यांतील अनेक जिल्ह्यांत पाऊस आणि गारपीट झाली. हीच स्थिती हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व जम्मू-काश्मिरातही कायम होती. तथापी पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम या राज्यांत अनेक ठिकाणी पाऊस झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पाकिस्तानवर आणि पंजाबवर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय राहिले, तर दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेशपर्यंत एक टर्फलाइन तयार झाली आहे. यामुळे पाऊस आणि गारपीट होण्याची स्थिती निर्माण होत आहे.

(हेही वाचा Uddhav Thackeray : अब की बार भाजपा तडीपार; उद्धव ठाकरे यांचा नारा)

महाराष्ट्र : पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतात हिमवृष्टी आणि पाऊस होत असल्यामुळे राज्यात आगामी दोन दिवस वातावरण अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज (Environment) वर्तवला आहे.
जम्मू-काश्मीर : जोरदार बर्फवृष्टी झाल्यानंतर १२ ठिकाणी भूस्खलन झाल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ रविवारी लागोपाठ दुसऱ्या दिवशी बंद होता. रामबनमध्ये अडकलेल्या केरळच्या २०० पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. पर्यटकांना प्रवास टाळण्यास सांगितले आहे.उत्तर प्रदेश : जवळपास ९ जिल्ह्यांत सकाळी ८:३० ते दुपारी २:३० वाजेपर्यंत गारपीट झाली. राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून चार लोकांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे लखनऊ शहरातील रस्ते खचले आहेत.

दिल्ली : राज्यात रविवारी सकाळी पाऊस झाला. राष्ट्रीय राजधानी व एनसीआरमध्ये पावसाचा हा लागोपाठ तिसरा दिवस आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.