Aged Parents : दोन वेळेच्या जेवणासाठी आई-वडिलांचे पोटच्या मुलांविरोधात ७ लाख खटले

देशभरातील ज्येष्ठांच्या (Aged Parents) एकूण ३५ लाख खटल्यांत सात लाखांपर्यंत प्रकरणे मुलांनी वाऱ्यावर सोडल्याची, निर्वाह भत्ता न दिल्याची आहेत.

531

पोटच्या मुलांनी दोन वेळेचे जेवण तरी द्यावे, म्हणून देशभरातील सात लाख पालकांनी (Aged Parents) खटले दाखल केले आहेत. अपत्यांविरुद्ध ज्येष्ठांचे एकूण ३५ लाख खटले आहेत. लाखो ज्येष्ठ नागरिक न्यायालयांचे खेटे मारून थकले आहेत.

देशभरातील ज्येष्ठांच्या (Aged Parents) एकूण ३५ लाख खटल्यांत सात लाखांपर्यंत प्रकरणे मुलांनी वाऱ्यावर सोडल्याची, निर्वाह भत्ता न दिल्याची आहेत. जन्मदात्यांना दोन वेळचे जेवण आणि औषधांनाही पैसे देत नसल्याची अनेक प्रकरणे आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने अशा स्वरूपाचे खटले त्वरित निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत. याउपर अनेक खटले १० वर्षांपासून प्रलंबित आहेत. अस्वस्थ आधारवडांच्या (Aged Parents) यादीत उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र, कर्नाटक अग्रक्रमांकावर आहेत. मुलांनी दोन वेळेचे जेवण तरी द्यावे म्हणून देशातील २४ उच्च न्यायालयांत ७ लाख ६२ खटले प्रलंबित आहेत. एकट्या राजस्थान उच्च न्यायालयात अशा स्वरूपाच्या प्रलंबित खटल्यांची संख्या १ लाख ३ हजार २३३ आहे.

(हेही वाचा MSRTC : एसटीच्या १०३ चालकांना ‘शॉर्टकट’ पडला महागात; थांबे वगळून बस पुढे नेण्याच्या प्रकारामुळे कारवाई)

देशभरात ज्येष्ठांचे प्रलंबित खटले

राज्य                  संख्या

  • उत्तर प्रदेश       ४,९९,१६९
  • हरियाणा            ९४,२२८
  • महाराष्ट्र          ३,९७,३३८
  • पंजाब               ८६,३७७
  • कर्नाटक         २,७६,५०३
  • गुजरात             ८२,९१९
  • बिहार           २,५३,३४९
  • राजस्थान        १,०३,२३३
  • झारखंड           ४७,६८४
  • दिल्ली             ४७,१३४
  • मध्य प्रदेश      १,००,८१८
  • छत्तीसगड         १६,८९४

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.