Online Beating च्या नादात बँक मॅनेजरनेच लुटली स्वतःची बँक; ३ कोटींचे सोने गायब

मनोज म्हस्के (३३) आणि शेख असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून मनोज म्हस्के हा एसबीआय बँक मुलुंड शाखेच्या पर्सनल ब्रँच सर्व्हिस मॅनेजर म्हणून नोकरीला होता, तर शेख याने मनोजला सोनं विकण्यास मदत करीत होता.

299
Online Beating च्या नादात बँक मॅनेजरनेच लुटली स्वतःची बँक; ३ कोटींचे सोने गायब

‘ऑनलाईन बेटिंग’ (Online Beating) खेळण्याचा नाद लागलेल्या एका बँक मॅनेजरने स्वतःच्या बँकेचे लॉकरमधील ३ कोटींच्या सोन्यावर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार पूर्व उपनगरातील भांडुप येथे उघडकीस आला आहे. (Bank Manager Arrested For Stealing Gold Worth) मॅनेजरने डल्ला मारलेले सोन्याचे दागिने ग्राहकांनी बँकेकडे तारण (Gold Loan) ठेवलेले होते. पोलिसांना बँक मॅनेजरच्या मोबाईल फोनमध्ये ऑनलाईन बेटिंग अँप्लिकेशन मिळून आले असून त्यात अनेक आर्थिक व्यवहार झाल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. पोलिसांना संशय आहे की, बँक मॅनेजरने चोरलेले दागिने विकून आलेले ३ कोटी रुपये बँक मॅनेजरने ‘ऑनलाईन बेटिंग’ (Online Beating) जुगारावर उडवले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी बँक मॅनेजर आणि सोनं विकण्यास मदत करणारा असे दोन जणांना अटक केली आहे. या दोघांना न्यायालयाने ७ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Online Beating)

मनोज म्हस्के (३३) आणि शेख असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून मनोज म्हस्के हा एसबीआय बँक मुलुंड शाखेच्या पर्सनल ब्रँच सर्व्हिस मॅनेजर (Mulund Branch of SBI Personal Banking Branch located at Runwal Greens in Nahur) म्हणून नोकरीला होता, तर शेख याने मनोजला सोने विकण्यास मदत करीत होता. मुलुंड -नाहूर येथील रूणवाल ग्रीन या ठिकाणी असलेल्या एसबीआयच्या वैयक्तिक बँकिंग शाखेच्या मुलुंड शाखेत प्रशासक म्हणून काम करणारे अमित कुमार यांनी भांडुप पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार बँकेत ग्राहकांनी सोने गहाण ठेवून घेतलेल्या कर्जातील जवळपास ३ कोटी रुपयांचे सोने बँकेच्या लॉकरमधून गहाळ झाल्याचे समोर आले आहे. या लॉकरच्या दोन चाव्या आहेत आणि फक्त दोन्ही चाव्या घालून उघडता येतात, त्यापैकी एक सर्व्हिस मॅनेजरकडे राहते आणि दुसरी शाखेत कॅश इनचार्ज म्हणून काम करणाऱ्या स्वेता सोहनी यांच्याकडे असते. (Online Beating)

(हेही वाचा – Ajit Pawar : अजित पवारांचा शिरूरमध्ये येऊन खासदार अमोल कोल्हेंविषयी केला धक्कादायक गौप्यस्फोट; म्हणाले… )

अशी झाली गुन्ह्याची उकल 

२७ फेब्रुवारी रोजी मनोज म्हस्के रजेवर असताना प्रशासक अमित कुमार यांच्याकडे लॉकरची जबाबदारी होती, त्यांनी कोअर बँकिंग सिस्टीममध्ये (CBS) तशी नोटही दाखल केली. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कुमार लॉकरमध्ये रोख रक्कम आणि दागिने जमा करण्यासाठी गेले असता त्यांना सोन्याच्या दागिन्यांची अनेक पाकिटे गायब असल्याचे दिसले. त्याने कागदपत्रे व्यवस्थित तपासली असता, बँकेच्या या शाखेने सोनं तारण ठेवून ६३ ग्राहकांचे सोने तारण ठेवून कर्जे दिली होती. लॉकरमध्ये असलेल्या ६३ सोन्याच्या पाकिटांपैकी ५९ पाकिटे गहाळ झाली होती, व लॉकरमध्ये केवळ ४ पाकिटे शिल्लक होती. अमित कुमार यांनी ही बाब बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. बँक अधिकाऱ्यांनी सुट्टीवर असलेल्या सर्व्हिस मॅनेजर मनोज म्हस्के याला तातडीने बँकेत बोलावून त्याच्याकडे गहाळ झालेल्या सोन्याच्या पाकिटाबाबत चौकशी केली असता त्यांनी ती त्यानेच गहाळ केल्याची कबुली देत यापैकी काही सोने दुसरीकडे तारण ठेवले तर काही सोन विकल्याची कबुली दिली. मी लवकरच सोने परत करतो असे बोलून त्याने बँकेकडे वेळ मागून घेतला, परंतु बँकेने त्याला कुठलाही वेळ न देता भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (Bank Manager arrested for stealing gold worth 3 Cr)

भांडुप पोलिसांनी भादंवि कलम ४०९ (अपहार करणे) अन्वये (under section 409 (criminal breach of trust by public servant or banker, etc.) of the Indian Penal Code.) गुन्हा दाखल करून मनोज म्हस्के आणि त्याचा साथीदार शेख याला अटक करण्यात आली. मनोज मस्के याच्या चौकशीत “म्हस्के याला कथितरित्या ऑनलाईन सट्टा खेळण्याची सवय आहे, त्याच्या मोबाईल फोनमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी ॲप्ससह त्याचे अनेक आर्थिक व्यवहार आढळले आहेत. “म्हस्के याने सोने कुठे गहाण ठेवले याबद्दल आम्ही बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ज्या ठिकाणी सोन गहाण ठेवले अथवा विकले त्यांना कायदेशीर नोटिसा पाठवणार आहोत, आम्ही त्यांच्याकडून गुन्ह्यातील लूट जप्त करू शकतो,” असे तपास अधिकाऱ्याने सांगितले. (Online Beating)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.