Mandapeshwar Guha Shiva Temple: बोरिवलीत मंडपेश्वर गुहा शिव मंदिराचे सौंदर्यीकरण, तीन दिवसीय महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

142
Mandapeshwar Guha Shiva Temple: बोरिवलीत मंडपेश्वर गुहा शिव मंदिराचे सौंदर्यीकरण, तीन दिवसीय महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
Mandapeshwar Guha Shiva Temple: बोरिवलीत मंडपेश्वर गुहा शिव मंदिराचे सौंदर्यीकरण, तीन दिवसीय महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मंडपेश्वर गुफा मंदिरात महाशिवरात्री महोत्सवानिमित्त (Mandapeshwar Guha Shiva Temple) मंडपेश्वर गुहेचे सौंदर्यीकरण आणि १२ किलो चांदीच्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा, भव्य पूजा सोहळा तसेच महोत्सवानिमित्त तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी, ८ मार्चला सायंकाळी ६ वाजता हा साजरा होणार आहे. खासदार गोपाळ शेट्टी यांच्या निधीतून आणि आमदार श्रीमती मनीषाताई चौधरी यांच्या सहकार्याने मंदिराच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार प्रविण दरेकर, आमदार विजय (भाई) गिरकर यांची उपस्थिती लाभणार आहे तसेच अतुल भातखळकर, योगेश सागर, श्रीमती चौधरी, सुनील राणे, जे.पी. मिश्रा, श्रीकांत पाण्डेय, डॉ. योगेश दुबे, गणेश खणकर, सत्यप्रकाश सिंह, दिलीप पंडित, निखिल व्यास, अमर शाह, योगिता पाटील हे मान्यवर पाहुणेही उपस्थित राहणार आहेत.

(हेही वाचा – Government Bank Employees: सरकारी बँक कर्मचाऱ्यांना मोदींकडून खास भेट! आठवड्यातून ५ दिवस काम, पगारात १७ टक्के वाढ)

६ ते ८ मार्चपर्यंत आयोजन
६ ते ८ मार्चपर्यंत मंडपेश्वर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी, ६ मार्चला अखंड रामायणाचा पाठ, गुरुवारी, ७ मार्चला सकाळी ९ ते १२ या वेळेत अखंड रामायण पूर्णाहुती हवन सोहळा, दुपारी १ ते ४ शिव चर्चा, सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत महिला भक्तांनी सादर केलेले भजन किर्तन, सायंकाळी ५ ते ८ वाजता सुप्रसिद्ध लोकगीतांचा कार्यक्रम, रात्रौ ८.३० ते ९.३० वाजता भरतनाट्यम नृत्य, शुक्रवारी, ८ मार्चला सकाळी ९ ते १२ यादरम्यान लघुरुद्र, सायंकाळी ५ वाजता गावदेवी प्रासादिक मंडळाकडून भजन संध्या, सायंकाळी ६.३० वाजता केरळ तिरुवाथिरकली पारंपरिक नृत्य, अशी विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्या भक्तांना लघुरुद्र कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी रजनी अग्रवाल ९८६९६७६५१३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.