Advocate : सरकारी वकिलांच्या नेमणुकीचे बनावट आदेश; गृहविभागाच्या उपसचिवासह पाच जणांवर गुन्हा दाखल

गृहविभागाचे तत्कालीन उपसचिव किशोर भालेराव, वकील शेखर जगताप, बांधकाम व्यवसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्यासह पाच जणांच्या नावाचा दाखल करण्यात आलेल्या एफआयआर (प्रथम खबरी अहवाल) मध्ये उल्लेख आहे.

280
Advocate General of maharashtra : कोण आहेत महाराष्ट्राचे महाअधिवक्ता?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह दोन पोलीस अधिकारी आणि एका व्यवसायिकावर दाखल असलेल्या गुन्ह्यात विशेष सरकारी वकिलांच्या नेमणुकीचे बनावट आदेश काढणारे गृहविभागाचे उपसचिव, वकिलांसह पाच जणांविरुद्ध खोटे दस्तावेज न्यायालयात सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बोगस नेमणुकीचे आदेश हे न्यायालयात उभे राहून गुन्ह्यातील आरोपींच्या जामीनाला विरोध करण्यासाठी काढण्यात आले होते. (Advocate)

गृहविभागाचे तत्कालीन उपसचिव किशोर भालेराव, वकील शेखर जगताप, बांधकाम व्यवसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्यासह पाच जणांच्या नावाचा दाखल करण्यात आलेल्या एफआयआर (प्रथम खबरी अहवाल) मध्ये उल्लेख आहे. २०२१ मध्ये मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात श्यामसुंदर अग्रवाल यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तसेच व्यावसायिक संजय पुनामिया यांच्या विरुद्ध खंडणीचा आरोप करून तक्रार दाखल करण्यात आली होती. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता, हे प्रकरण सीआयडी (CID) कडे वर्ग करण्यात आले होते. सीआयडीने (CID) या प्रकरणात संजय पुनामियासह दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. (Advocate)

(हेही वाचा – Samsung : सॅमसंगकडून बेस्‍ट सुपर ऑफर, ६००० एमएएच बॅटरी असलेला गॅलॅक्‍सी एफ१५ ५जी लाँच)

तपासात ही माहिती आली समोर 

हे प्रकरण स्थानिक न्यायालयात सुरू असताना सरकारी वकील (Advocate) म्हणून शेखर जगताप हे काम बघत होते. स्थानिक न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज रद्द केल्यानंतर आरोपींनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, त्याठिकाणी विशेष सरकारी वकील म्हणून शेखर जगताप यांनी संजय पुनामिया याच्या जामीनाला विरोध केला, सत्र न्यायालयाने जामीन रद्द केल्यानंतर उच्च न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला, तिकडे देखील विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी विरोध केल्यामुळे जामीन रद्द झाला होता. दरम्यान काही महिन्यांनी आरोपी संजय पुनामिया हे जामिनावर बाहेर पडल्यावर त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली वकील शेखर जगताप यांची सत्र आणि उच्च न्यायालयात विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक होती का याबाबत माहिती मागवली असता पुनामिया यांना शेखर जगताप यांची सत्र आणि उच्च न्यायालयात नेमणूक करण्यात आली नव्हती अशी माहिती समोर आली. (Advocate)

दरम्यान विशेष सरकारी वकील (Advocate) म्हणून शेखर जगताप यांनी सत्र आणि उच्च न्यायालयात सादर केलेली नेमणुकीचा आदेश कोणी काढला व याबाबत माहिती मिळवली असता गृहविभागावाचे उपसचिव किशोर भालेराव यांनी शेखर जगताप यांची बनावट आदेश काढल्याची माहिती समोर आल्यानंतर पुनामिया यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण बाहेर येताच गृहविभागाचे उपसचिव किशोर भालेराव यांना २९ जानेवारी २०२४ रोजी निलंबित करण्यात आले, पोलीस तपासात हे आदेश बोगस होते हे निष्पन्न होताच रविवारी कुलाबा पोलिसांनी संजय पुनामिया याचा जबाब नोंदवून वकील शेखर जगताप, गृहविभागाने तत्कालीन उपसचिव किशोर भालेराव, मारिन ड्राईव्ह गुन्हयातील फिर्यादी श्यामसुंदर अग्रवालसह पाच जणांविरुद्ध फसवणूक, बोगस दस्तवेज तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Advocate)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.