पोर्ट ब्लेअर विमानतळाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात आले आहे. अंदमान येथील सेल्युलर जेलमध्येच स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिशांनी काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती. अंदमान येथे शिक्षा भोगत असतांनाच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘कमला’ हे महाकाव्य लिहिले. सावरकरांनी देशाच्या रक्षणासाठी अंदमानमध्ये भोगलेल्या शिक्षेचे स्मरण रहावे, यासाठी 2002 मध्ये पोर्ट ब्लेअर (Port Blair) आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून ‘वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे करण्यात आले. 4 जुलै 1911 ते 21 मे 1921 या काळात सावरकर येथील सेल्युलर तुरुंगात होते. (Veer Savarkar)
(हेही वाचा – Veer Savarkar: एका तासात एका लाखावर व्ह्यूज आणि दीड हजारांवर कॉमेंट्स… ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचा टिझर हिट)
Dear @IndiGo6E, you announce the name of the particular airport on arrival.
Like, #Indira’s name is taken on arrival at Delhi,#Rajiv’s in Hyderabad.
Then why is #VeerSavarkar’s name not announced on arrival at Port Blair?@MoCA_GoI should take immediate cognisance.@JM_Scindia pic.twitter.com/nhZ9RxrG9s
— Sunil Deodhar (Modi Ka Parivar) (@Sunil_Deodhar) March 5, 2024
अंदमानमध्ये सावरकरांचे नाव घेतले पाहिजे
अंदमानचे हे विमानतळ सध्या चर्चेत आले आहे. भाजप नेते आणि आंध्र प्रदेशचे सह-प्रभारी सुनील देवधर (Sunil Deodhar) यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अंदमान बेटांवरच वीर सावरकरांच्या नावाचा उल्लेख वगळला जात आहे, हे दिसून येत आहे. सुनील देवधर यांनी इंडिगो (Indigo) विमानातील व्हिडिओ पोस्ट केला आहे. ते इंडिगो विमानाच्या फ्लाइट अटेंडंटला सांगत आहेत की, या विमानतळाला ‘वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ (Veer Savarkar International Airport) म्हणतात. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाप्रमाणेच या विमानतळाचेही नाव घेतले पाहिजे. ते पुढे म्हणतात की, अंदमानमध्ये आल्यावर सावरकरांचे नाव घेतले पाहिजे. सुनील देवधर यांनी विमानातील सर्व प्रवाशांनाही विचारले की, “तुम्ही माझ्याशी सहमत आहात का ?” यावर सर्व प्रवाशांनीही ‘हो’ म्हणून अनुमोदन दिले.
या समस्येकडे ताबडतोब लक्ष द्या
इंडिगोला टॅग करत सुनील देवधरने लिहिले की, प्रिय @IndiGo6E, तुम्ही आगमनानंतर विशेष विमानतळाचे नाव जाहीर करता का? उदाहरणार्थ, जेव्हा आम्ही दिल्लीत येतो तेव्हा इंदिरा गांधी यांचे नाव घेतले जाते. आम्ही हैदराबादमध्ये येतो, तेव्हा राजीव गांधी यांचे नाव घेतले जाते. पोर्ट ब्लेअरला पोहोचल्यावर वीर सावरकरांचे नाव का जाहीर केले गेले नाही ? या पोस्टमध्ये त्यांनी नागरी उड्डाण मंत्रालय (Ministry of Civil Aviation) आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांनाही टॅग केले आणि हा मुद्दा तातडीने उचलला जावा, अशी मागणी केली आहे. (Veer Savarkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community