Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल हॅक; थेट राज्यपालांना केला ईमेल

ईमेल हॅकप्रकरणी सायबर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून याचा सखोल तपास सुरु आहे. असा कोणताही मेल केला नसल्याचेही काहीजण सांगत आहेत. पोलीस तपासात काय निष्पन्न होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

219
Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल हॅक; थेट राज्यपालांना केला ईमेल

आज म्हणजेच मंगळवार ५ मार्च रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांचा ईमेल आयडी अज्ञातांकडून हॅक करण्यात आला असून राज्यपालांना एक ई-मेल पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाची विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी मरीन लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

(हेही वाचा – Veer Savarkar : पोर्ट ब्लेअर विमानतळावर टाळला जातो वीर सावरकरांचा उल्लेख; सुनील देवधर यांनी केली ‘ही’ मागणी)

नार्वेकर यांच्या ई-मेल आयडीवरून महाराष्ट्राच्या राज्यपालांना पाठवलेला ई-मेल स्वतः नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी नाकारला. राज्यपाल कार्यालयाने चौकशी केली असता नार्वेकर यांनी असा कोणताही ईमेल पाठवला नसल्याचे स्पष्ट केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-मेलमध्ये काही आमदारांच्या सभागृहाच्या वर्तनाबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

अलीकडेच, उद्धव ठाकरे यांच्या गटाला धक्का देत, एकनाथ शिंदे यांचा शिवसेना हा खरा पक्ष आहे, असा निकाल देऊन नार्वेकर (Rahul Narwekar) चर्चेत आले. राष्ट्रवादी फुटल्याच्या प्रकरणातही त्यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला होता.

(हेही वाचा – Nitesh Rane : संजय राऊत म्हणजे दुतोंडी साप, नीतेश राणे यांचा हल्लाबोल)

ईमेल हॅकप्रकरणी (Rahul Narwekar) सायबर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून याचा सखोल तपास सुरु आहे. असा कोणताही मेल केला नसल्याचेही काहीजण सांगत आहेत. पोलीस तपासात काय निष्पन्न होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

फोन हॅक होऊ नये म्हणून काय कराल ?

आपला मोबाईल नंबर बँक खाते, मेल, यूपीआय पेमेंटचे खाते, मोबाईल वॉलेट, आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र अशा अनेक महत्त्वाच्या दस्तऐवजांशी संलग्न आहे. यामुळे प्रत्येकासाठी मोबाईल आणि त्यामधील पर्सनल डेटा सुरक्षित राखणे आवश्यक झाले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.