Narendra Modi: पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, सोशल मीडियावर व्हिडियो केला पोस्ट

पोलीस व्हायरल व्हिडीयोमधील व्यक्तीचा शोध घेत आहेत.

198
Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी घेतली संदेशखाली येथील पीडित महिलांची भेट
Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी घेतली संदेशखाली येथील पीडित महिलांची भेट

कर्नाटकातल्या मोहम्मद रसूल कद्दारे नावाच्या एका व्यक्तीने सोशल मिडियाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या व्यक्तिने हातात तलवार घेऊन सोशल मिडीयावर त्याने चित्रीत केलेला धमकीचा व्हिडियो व्हायरल केला आहे. केंद्रात कॉंग्रेसची सत्ता आल्यास ‘मी मोदींना जीवे मारणार’ असल्याची धमकीही त्याने व्हिडियोद्वारे मोदिंना दिली आहे.

वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल
पोलीस व्हायरल व्हिडीयोमधील व्यक्तीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम ५०५ (१) (ब), २५ (१) (ब) तसेच शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकमधील सूरपूर पोलीस ठाण्यात या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल हॅक; थेट राज्यपालांना केला ईमेल)

आरोपी फरार, पोलिसांचा शोध सुरू
आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर मोहम्मद याने केंद्रात कॉंग्रेसची सत्ता आल्यास मी मोदींना जीवे मारणार, अशी सोशल मिडियाद्वारे धमकी दिल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर गेली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मोहम्मद हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.