Nitin Gadkari : मनमोहन सिंग यांचे सरकार मुके आणि बहिरे; नितीन गडकरी यांची काँग्रेस सरकारवर जोरदार टीका

Nitin Gadkari : मनमोहन सिंग यांचे सरकार मुके आणि बहिरे; नितीन गडकरी यांची काँग्रेस सरकारवर जोरदार टीका

229
Nitin Gadkari : मनमोहन सिंग यांचे सरकार मुके आणि बहिरे; नितीन गडकरी यांची काँग्रेस सरकारवर जोरदार टीका
Nitin Gadkari : मनमोहन सिंग यांचे सरकार मुके आणि बहिरे; नितीन गडकरी यांची काँग्रेस सरकारवर जोरदार टीका

देशात मोदी सरकार येण्यापूर्वी 2014 मध्ये देश कर्जात बुडाला होता, दिल्लीत अशी सरकारे होती, ज्यांना डोळे होते पण दिसत नव्हते. कान होते; पण ऐकू येत नव्हते. तोंड होते; पण बोलता येत नव्हते. दिल्लीत मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या नेतृत्वात असे मुके-बहिरे सरकार होते, असे म्हणत नितीन गडकरी यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारवर आणि मनमोहनसिंग यांच्यावर टीका केली. नागपूर येथील एका सभेला संबोधित करतांना नितीन गडकरी (Nitin Gadkari) बोलत होते. नितीन गडकरी यांनी मोदी यांचे ‘योग्य नीती आणि योग्य नेता’ अशा शब्दांत कौतुक केले.

(हेही वाचा – A Raja : भारत एक राष्ट्र नाही, आम्ही रामाचे शत्रू; द्रमुक नेते ए राजा यांची हिंदुद्वेषी गरळओक चालूच)

सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवा

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वात देशातील जनतेने भाजपला संधी दिली. आता मोदी सरकारच्या नेतृत्वात जवळपास 10 वर्षे पूर्ण होत आहेत. काँग्रेसचे 65 वर्षे आणि भाजपाने मोदींच्या नेतृत्वात केलेल्या गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या कामाची तुलना करा. किती पोर्ट बनले आहेत, किती एअरपोर्ट बनले आहेत, किती महामार्ग बनले आहेत, किती रेल्वे स्टेशन बनले आहेत. प्रत्येक ठिकाणी मोठा बदल झालेला आपणास दिसून येत आहे. सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तरुणांनी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.

विदर्भातील 68 हजार लोकांना रोजगार

निती आयोगाच्या (Niti Aayog) अहवालातून पुढे आलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारच्या काळात फूटपाथवर दुकान चालवणाऱ्या 80 लाख लोकांना बँकांनी कर्ज दिले आहे. तरुणाईला कर्ज मिळत आहे. नागपुरात जेव्हा आम्ही मिहान प्रकल्प सुरू केला, तेव्हा शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांनी विरोध केला. हा प्रकल्प होऊ नये म्हणून आंदोलन करण्यात आले. आज या प्रकल्पात जगभरातून विविध कंपन्या आल्या आहेत. विदर्भातील 68 हजार लोकांना या माध्यमातून रोजगार मिळाला आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. (Nitin Gadkari)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.