Andheri-Ghatkopar : अंधेरी-घाटकोपर जोड मार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकामातील अडथळा दूर

घाटकोपर एन विभागातील ३८ अनधिकृत बांधकामे हटवली

6266
Andheri-Ghatkopar : अंधेरी-घाटकोपर जोड मार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकामातील अडथळा दूर
Andheri-Ghatkopar : अंधेरी-घाटकोपर जोड मार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकामातील अडथळा दूर

अंधेरी-घाटकोपर (Andheri-Ghatkopar) जोड रस्ता परिसरातील पूर्व द्रुतगती मार्गाच्या रुंदीकरणात तसेच उड्डाणपुलाच्या उभारणीत अडथळा येणारी (Andheri-Ghatkopar) अनधिकृत बांधकामे मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागामार्फत  मंगळवारी ५ मार्च २०२४ रोजी जमिनदोस्त केली. या कारवाईत ३८ अनधिकृत बांधकामे (Unauthorized constructions) तसेच अतिक्रमणे हटविण्यात आली असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. (Andheri-Ghatkopar)

दोन्ही बाजुची वाहतूक सुरु राहील

मुंबई महानगरपालिकेचे (Bmc) उप आयुक्त (परिमंडळ ६) रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांच्या निर्देशानुसार एन विभागाच्यावतीने ही अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली. पूर्व द्रुतगती मार्ग ते गोळीबार रस्त्यापर्यंत येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहतुकीसाठी ‘महारेल’ (Maharashtra Rail Infrastructure Development Corporation Limited) कडून अंधेरी-घाटकोपर (Andheri-Ghatkopar) जोड रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. त्यामुळे परिसरातील दोन्ही बाजूची वाहतूक गोळीबार रस्ता ते पूर्व द्रुतगती मार्ग अशी सुरू राहणार आहे. (Andheri-Ghatkopar)

(हेही वाचा- Gokhale Bridge : गोपाळकृष्ण गोखले पूल बर्फीवाला पुलाला जोडण्यासाठी ‘व्हीजेटीआय’ची मदत)

सात वेळा बैठका घेऊनही…

त्यासाठी अंधेरी-घाटकोपर (Andheri-Ghatkopar) जोड रस्ता पूर्व द्रुतगती मार्ग ते गोळीबार रस्त्यापर्यंत ४५.७ मीटरने रुंद करण्याचे काम सुरू आहे. या रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणधारकांना महानगरपालिकेच्या एन विभागाकडून वारंवार कळविण्यात आले होते. तसेच आतापर्यंत सात वेळा बैठका घेवून या कारवाईची कल्पनाही देण्यात आली होती. मात्र तरीही रुंदीकरणात अडथळा ठरणारी ही अनधिकृत बांधकामे (Unauthorized constructions) जैसे थे होती. (Andheri-Ghatkopar)

New Project 2024 03 05T190612.757

तब्बल १०० मीटरचा भाग केला खुला

अखेर एन विभागाने कारवाईचा बडगा उगारत या कारवाईत ३८ पक्की बांधकामे हटवण्यात आली. यामुळे १०० मीटरचा रस्ता खुला झाला. मंगळवारी झालेल्या कारवाईत एन विभागातील अतिक्रमण निर्मूलन पथकाचे अधिकारी, कर्मचारी तसेच ६० पोलीस अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. उर्वरित अनिधकृत बांधकामेही (Unauthorized constructions) पुढील आठवड्यात काढण्यात येणार असल्याची माहिती एन विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी दिली. (Andheri-Ghatkopar)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.