Bomb Threat Karnataka : २५ लाख डॉलर दिले नाही तर…; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आला धमकीचा ई-मेल

Bomb Threat Karnataka : आता जो चित्रपटाचा ट्रेलर दाखवला, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे ? जर आम्हाला २५ लाख डॉलर दिले नाही, तर आम्ही कर्नाटकात बस, रेल्वे, मंदिरे, हॉटेल आणि सार्वजनिक ठिकाणांना लक्ष्य करू, अशी धमकी कर्नाटकच्या मंत्रीमंडळाला मिळाली आहे.

177
Bomb Threat Karnataka : २५ लाख डॉलर दिले नाही तर...; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आला धमकीचा ई-मेल
Bomb Threat Karnataka : २५ लाख डॉलर दिले नाही तर...; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आला धमकीचा ई-मेल

कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेत (Rameswaram Cafe) ४ दिवसांपूर्वीच स्फोट झाला आहे. या प्रकरणी पोलीस तपास चालू असतांनाच कर्नाटकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्व मंत्र्यांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आला आहे. या धमकीच्या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. सायबर क्राइम स्टेशनने (Cyber ​​Crime Station) या प्रकरणी FIR दाखल करून तपास सुरू केला आहे. (Bomb Threat Karnataka)

(हेही वाचा – Amit Shah : महाराष्ट्र ५० वर्षांपासून शरद पवारांचं ओझं वाहतोय; अमित शाह यांची महाविकास आघाडीवर सडकून टीका)

कर्नाटकात सार्वजनिक ठिकाणांना लक्ष्य करू

आता जो चित्रपटाचा ट्रेलर दाखवला, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे ? जर आम्हाला २५ लाख डॉलर दिले नाही, तर आम्ही कर्नाटकात बस, रेल्वे, मंदिरे, हॉटेल आणि सार्वजनिक ठिकाणांना लक्ष्य करू, असे या धमकीच्या ई-मेलमध्ये म्हटले आहे. ही धमकी [email protected] या ई-मेल आयडीवरून मिळाली आहे.

९ मार्च रोजी बेंगळुरूमध्ये २.४८ मिनिटांनी बॉम्बस्फोट  

या ई-मेलमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah), उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार (DK Shivakumar), गृहमंत्री परमेश्वरा आणि बेंगळुरू पोलीस आयुक्त यांना लक्ष्य केले जाणार असल्याची धमकी दिली आहे. शाहिद खान या नावाने आलेल्या मेलमध्ये शनिवारी ९ मार्च रोजी बेंगळुरूमध्ये दुपारी २.४८ मिनिटांनी बॉम्बस्फोट होईल असे म्हटले आहे. तसेच अंबारी उत्सवात बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे.

बेंगळुरू पोलीस आयुक्तांना स्वतंत्र धमकीचा मेल आला आहे. यामुळे राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या ई-मेलनंतर संपूर्ण राज्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. (Bomb Threat Karnataka)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.