सचिन धानजी,मुंबई
मुंबई महापालिकेच्या इतिहासात महापालिका (BMC) आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त प्रकल्प पी वेलरासू (Iqbal singh Chahal) यांचे नाव इतिहासात नोंद होणार आहे. महापालिकेच्यावतीने (Municipal Commissioner) पूर्व मुक्त मार्ग ऑरेंज गेटपासून ते गँटरोड भागापर्यंत उड्डाणपूलाचे काम बांधकाम केले जाणार असून या उड्डाणपुलाच्या बांधकामाची निविदा २९ फेब्रुवारीला उघड्यात आले आणि २ मार्च रोजी सुट्टीच्या दिवशी मंजुरी देत कार्यादेश देण्यात आला. त्यामुळे तब्बल अवघ्या ४८ ते ७२ तासांमध्ये याची प्रक्रिया राबवत कामांचे कार्यादेश देण्याची महत्वाची भूमिका बजावली. पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग एक्सेस मार्गानंतर या प्रस्तावाच्या कामांसाठी ४८ ते तासांमध्ये सर्व यंत्रणाला कामाला लावून प्रस्तावाला मंजुरी मिळवून, कार्यादेश देण्याची किमया चहल आणि पी वेलरासू आदींनी साधली असल्याने महापालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. (BMC)
या कामासाठी या कंपनीची निवड
पूर्व मुक्त मार्ग (इस्टर्न फ्रि वे) ऑरेंज गेट ते ग्रँटरोड मधील ताडदेव व नाना चौक यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या (BMC) कामांसाठी २० जानेवारी २०२४ रोजी निविदा मागवली होती. त्यानंतर ३१ जानेवारी २०२४ रोजी निविदा पूर्व बैठक पार पडली. त्यानंतर निविदेतील दोन पाकीट १७ फेब्रुवारी रोजी उघडण्यात आले. आणि अंतिम पाकीट हे २९ फेब्रुवारी २०२४ रोजी उघडण्यात आले. या निविदेत सर्वांत कमी बोली लावून जे कुमार-आरपीएस या संयुक्त भागीदारातील कंपनी पात्र ठरली आहे. या कामांसाठी विविध करांसह ३००३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. २९ फेब्रुवारीला अंतिम निविदा खुली करण्यात आली आणि १ मार्च रोजी खातेप्रमुख, उपायुक्त (पायाभूत सुविधा), अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) आदींसह आयुक्तांची प्रशासकीय मान्यता घेऊन स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सुट्टीच्या दिवशी म्हणजे २ मार्च रोजी पाठवून प्रशासकांची मंजुरी घेत त्याच दिवशी कार्यादेश देण्याची किमया साधली आहे. (BMC)
वाहनांची कोंडी आणि धिम्या गतीने होणारी वाहतूक
एम.एम.आर.डी.ए. ने पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पुर्व द्रुतगती महामार्ग माहे नोव्हेंबर २०२२ मध्ये महानगरपालिकेला (Municipal Commissioner) सुपूर्द केले असून प्रवास सुकर करण्याकरिता दोन्ही महामार्गाची देखरेख ठेवली जात आहे. त्याचवेळी, दोन्ही महामार्गावरील प्रवेश नियंत्रण प्रकल्पांतर्गत (Access Control Project), पूर्व द्रुतगती महामार्गावर एक संगमस्थान आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर तीन संगमस्थानांची सुधारणा करण्यात येणार असल्याची घोषणा महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. महामार्गांवर होणारी वाहनांची कोंडी आणि धिम्या गतीने होणारी वाहतूक अधिक गतीशिल बनवण्यासाठी हा निर्णय घेत महापालिकेने (Municipal Commissioner) तातडीने निविदा मागवल्या. या कामांच्या तब्बल ७०० कोटी रुपयांचे कंत्राट काम अवघ्या ४८ तासात फत्ते केले. २८ फेब्रुवारीला दुपारी निविदा खुली झाल्यानंतर पात्र कंपनीच्या निवडीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठीचा मसुदा तयार करून प्रशासकाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला. अवघ्या ४८ ते ७२ तासात प्रशासकीय मंजुरी घेवून शनिवारी कंत्राटदाराच्या हाती कार्यादेश सोपवण्याच्या प्रक्रिया राबवली. (BMC)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: भाजपा उच्चांक गाठणार, ओपिनियन पोलचा अंदाज; जाणून घ्या…)
दोन ते दिवसांमध्ये युध्दपातळीवर बनवला प्रस्ताव
त्यामुळे पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावरील ऍक्सेस कंट्रोलच्या कामांसाठी ७०० कोटी रुपये आणि इस्टर्न फ्रि वे ते ग्रँटरोड नाना चौक या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी विविध करांसह सुमारे ३००३ कोटी रुपये अशाप्रकारे एकूण ३७०० कोटी रुपयांचे प्रस्ताव महापालिकेतील प्रशासनाने अवघ्या ४८ ते ७२ तासांमध्ये प्रस्ताव मंजूर करण्याची प्रक्रिया राबवून एकप्रकारे विक्रम नोंदवला आहे. महापालिकेच्या इतिहासात निविदा अंतिम झाल्यानंतर दोन ते दिवसांमध्ये युध्दपातळीवर प्रस्ताव बनवून त्याला मंजुरी मिळवून कार्यादेश देण्याची प्रक्रिया राबववण्याचा प्रकार कधीच घडलेला आहे. त्यामुळे महापालिकेच्या इतिहासात या दोन्ही प्रस्तावांच्या मंजुरीची नोंद वेगळ्या प्रकारची ठेवली जाणार असून महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त प्रकल्प पी वेलरासू यांच्या नावाचीही नोंद महापालिकेच्या इतिहासात नोंद होईल असे महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे. (BMC)
असा असेल इस्टर्न फ्रि वे ते ग्रॅँटरोड मार्ग
पूर्व मुक्त मार्ग (इस्टर्न फ्रि वे) ऑरेंज गेट ते ग्रँटरोड मधील ताडदेव व नाना चौक या अंतरासाठी सध्याच्या स्थितीत ३० ते ४० मिनिटांचा कालावधी लागतो. पण या उड्डाणपुलाच्या प्रस्तावित बांधकामामुळे हे अंतर ६ ते ७ मिनिटांचे होणार आहे. या उड्डाणपुलाचे बांधकाम इस्टर्न फ्रि वेच्या ऑरेंज गेटपासून सुरु होईल आणि जे राठोड मार्ग, हँकॉक पूल, रामचंद्र भट्ट मार्ग, जे जे उड्डाणपूलावरून, एम. एस. अली मार्ग, व पठ्ठे बापुराव मार्ग आदी मार्गावरून या पुलाचे बांधकाम केले जाणार आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community