Mumbai Crime : बेपत्ता झालेल्या मुलाचा महिनाभराने सापडला मृतदेह

Mumbai Crime : वडाळा येथून महिन्याभरापूर्वी बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह वडाळा पूर्व मुक्त मार्ग पुलाजवळ मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

263
GST Return Scam : १७५ कोटींचा जीएसटी घोटाळा; कंपन्यांच्या संचालकपदावर हमाल, वेटर, ड्रायव्हर

वडाळा (Wadala) येथून महिन्याभरापूर्वी बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह वडाळा पूर्व मुक्त मार्ग पुलाच्या खाली मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मुलाचा मृतदेह दोन भागात कुजलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. या मुलावर लैगिंक अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुलाच्या मारेकऱ्याची ओळख पटविण्यात आली असून मारेकरी हा सराईत गुन्हेगार असून त्याला कोलकाता (Kolkata) येथे एका खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने वडाळा टीटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १२ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. वडाळा टिटी पोलिसांनी अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी बिपुल शिकारी याचा कसून शोध घेण्यात येत आहे. (Mumbai Crime)

(हेही वाचा- Rahul Narwekar : महाराष्ट्र भाडेनियंत्रण कायद्यात सुधारणा करणारा अध्यादेश तातडीने काढावा; विधानसभा अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र)

वडाळा (Wadala) ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २८ जानेवारी रोजी बेपत्ता झालेल्या १२ वर्षाच्या मुलाचा मृतदेह ३५ दिवसांनी वडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूर्व मुक्त मार्ग पुलाजवळील एका खाडीजवळ मंगळवारी मिळून आला आहे. मारेकऱ्याने मुलाची हत्या करून त्याचे मुंडके धडावेगळे केले आहे. वडाळा टिटी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालय येथे पाठवला असून हत्येपूर्वी मुलावर लैगिंक अत्याचार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. (Mumbai Crime)

आरोपी पोलिसांच्या तावडीतून निसटला…

२८ जानेवारी रोजी बेपत्ता झालेल्या १२ वर्षाच्या मुलाला त्याच परिसरात घटनेच्या काही आठवड्यापूर्वी राहण्यास आलेला बिपुल शिकारी याच्यासोबत शेवटचे बघितले होते. मुलगा बेपत्ता झाल्यानंतर रात्री उशिरा बिपुल शिकारी हा घरी एकटाच आला असता मुलाच्या वडिलांनी त्याच्याकडे मुलाबाबत चौकशी केली असता त्याने मुलाला तृतीयपंथीला विकल्याची कबुली दिली, असता लोकांनी त्याला वडाळा टिटी पोलीस ठाण्यात आणले होते. पोलीस त्याच्याकडे चौकशी करीत असताना संशयित आरोपीने पोलीस ठाण्यात स्वतःला इजा करून घेतली, चेहऱ्यावर रक्त लागल्यामुळे पोलिसांनी त्याला तोंड धुण्यासाठी पाठवले असता आरोपीने तेथून पळ काढला असा आरोप मृत मुलाच्या कुटुंबियांची केला आहे. (Mumbai Crime)

(हेही वाचा- Facebook Instagram Down : जगभरात फेसबुक, इंस्टाग्राम डाऊन; आपोआप होतेय लॉगआऊट)

आरोपीच्या शोधात पोलीस तीन राज्यात

वडाळा (Wadala) टिटी पोलीस ठाण्यातुन पळून गेलेला संशयित आरोपी बिपुल शिकारी हा पळून गेल्यामुळे पोलिसांना त्याच्यावरील संशय बळावला. पोलिसांनी बिपुलची माहिती काढली असता बिपुल हा कोलकाता राज्यात राहणारा असल्याचे कळताच वडाळा टिटी पोलीस ठाण्याचे पथक कोलकाता (Kolkata) येथे त्याच्या शोधासाठी रवाना झाले. दरम्यान एक धक्कादायक बातमी शोध पथकाला कळली. बिपुल याला कोलकाता येथे २०१४ मध्ये एका हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. कोविडमध्ये तो पॅरोलवर बाहेर आला होता अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली, शोध पथक बिपुलचा शोध घेत उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीर येथे पोहचले परंतु बिपुल पोलिसांच्या हाती लागला नाही.
मंगळवारी वडाळा येथे मुलाचा मृतदेह मिळून आल्यानंतर या प्रकरणाला गंभीर वळण लागले असून आरोपीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांची विविध पथके वेगवेगळ्या राज्यांमध्ये रवाना करण्यात आली आहेत. (Mumbai Crime)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.