चश्म्याचा नंबर कमी करण्यासाठी आहारात करा 'या' ६ अन्नपदार्थांचा समावेश !
मासेडोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले ओमेगा-3 ॲसिड्स सॅल्मन ट्यूना आणि सार्डिन या माशांमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. ओमेगा -3 डोळ्यांची जळजळ कमी करण्यास मदत करते. आहारात माशांचा समावेश करावा. यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा कमी होतो.
हिरव्या पालेभाज्या
पालक, कोबी आणि मोहरी यासारख्या हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असतात. हे अँटिऑक्सिडंट्स डोळ्याच्या मध्यभागी असलेल्या मॅक्युलाचे संरक्षण करतात, यामुळे दृष्टी सुधारते.
आंबट फळे
संत्री, द्राक्षे आणि लिंबू यामध्ये जीवनसत्त्व सी असते. व्हिटॅमिन 'सी'मुळे डोळ्यांच्या पेशींचे संरक्षण होण्यास मदत होते. त्यामुळे आहारात आंबट फळांचा समावेश करणे आवश्यक आहे.
अंडे आणि ड्राय फ्रूट्सअंड्यांमध्ये ल्युटीन, झेक्सॅन्थिन आणि झिंक भरपूर प्रमाणात असते. हे घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. बदाम, अक्रोड आणि फ्लेक्स सीड्स हे व्हिटॅमिन ईचे चांगले स्रोत आहेत. हे एक अँटिऑक्सिडेंट असून यामुळे डोळ्यांचे संरक्षण होते.
गाजर
गाजरात बीटा-कॅरोटीनचे प्रमाण जास्त असते. गाजर खाल्ल्याने बीटा कॅरोटिनचे 'जीवनसत्त्व ए' मध्ये रुपांतर होते. डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आहारात गाजराचा समावेश करावा. गाजर खाल्ल्याने रातांधळेपणे, कॉर्निया हे डोळ्यांचे आजार टळू शकतात तसेच डोळे निरोगी राहायलाही मदत होते.