Maratha Reservation : मराठा आरक्षणामुळे प्रवेश प्रक्रियेत किती जागांवर होणार परिणाम? जाणून घ्या…

या शैक्षणिक वर्षात राज्यात अल्पसंख्याक महाविद्यालयांतील जागा वगळता अन्य सर्वच महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये उपलब्ध शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या जागांची प्रवेश- रचना बदलावी लागणार आहे. ही रचना निश्चित झाल्यानंतरच प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.

222
मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणून शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण (Maratha Reservation) लागू झाल्याने राज्यातील अकरावी-बारावीसह पॉलिटेक्निक आणि सीईटी सेल अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांची संपूर्ण प्रवेश प्रक्रियाच बदलणार असून जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात ५० हजारहून अधिक प्रवेश मराठा आरक्षणातून होण्याची शक्यता आहे.
स्वतंत्र मागास (एसईबीसी) वर्गासाठीचे मराठा आरक्षण २६ फेब्रुवारीपासून अमलात आले आहे. त्यानुसार या सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाला १० टक्के आरक्षण (Maratha Reservation) देण्यात आले आहे. जूनपासून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात राज्यात अल्पसंख्याक महाविद्यालयांतील जागा वगळता अन्य सर्वच महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये उपलब्ध शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या जागांची प्रवेश- रचना बदलावी लागणार आहे. ही रचना निश्चित झाल्यानंतरच प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.
अभ्यासक्रम                                    एकूण जागा                 मराठा आरक्षण 
  • अकरावी (मुंबई)                          ३ लाख ६० हजार                ३६, ०००
  • आयटीआय                                १ लाख ४५ हजार                १४, ५००
  • सीईटीतून व्यावसायिक अभ्यासक्रम       ५.५ लाख                       ५५, ०००
  • पॉलिटेक्निक                             १ लाख ५ हजार                   १०, ५००

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.