- ऋजुता लुकतुके
भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मंगळवारी इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी हिमाचलप्रदेशमध्ये धरमशालाला पोहचलाच तो भव्य दिव्य एंट्री करत. तो चक्क हिमालयन पर्वत रांगांवरून उडून खाजगी चॉपरने धरमशाला मैदानाच्या आवारात थेट पोहोचला. मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी मिळवलेला भारतीय संघ ७ मार्चपासून धरमशाला इथं इंग्लंड विरुद्ध मालिकेतील शेवटची पाचवी कसोटी खेळणार आहे. (Ind vs Eng 5th Test)
भारतीय संघ या कसोटीसाठी रविवारीच धरमशालाला पोहोचला होता. पण, रोहित शर्मा (Rohit Sharma) आपली पत्नी आणि मुलगी समायरासह गुजरातच्या जामनगर इथं अंबानी कुटुंबीयांच्या मुलाच्या प्री-वेडिंग सोहळ्यात सहभागी झाला होता. त्यामुळे तो दोन दिवस उशिरा धरमशालाला आला. आणि आला तोच त्याच्यासाठी सोय केलेल्या चॉपरने. (Ind vs Eng 5th Test)
भारतीय टीम के कप्तान रोहित शर्मा पहुंचे धर्मशाला@ICC @BCCI @JayShah @ThakurArunS @SpKangra @himachalpolice #IndianPlayers #warmup #rohitsharma #indiavsengland #HPCAStadiumDharamshala pic.twitter.com/IoIYdP1S2i
— Himachal Abhi Abhi (@himachal_abhi) March 5, 2024
(हेही वाचा – Governor appointed Legislative Council MLA : राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्त्या लांबणीवर; कारण…)
पाचव्या कसोटीसाठी धरमशालाची खेळपट्टी फिरकीला साथ देते की, तेज गोलंदाजांसाठी इथं मदत मिळते याची उत्सुकता सगळ्यांना आहे. कसोटीत भारतीय संघाने पहिली हैद्रबाद कसोटी २८ धावांनी गमावली होती. पण, त्यानंतर विशाखापट्टणम, राजकोट आणि रांची इथं भारताने निर्णायक विजय मिळवले. यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सर्फराझ खान. ध्रुव जुरेल आणि आकाशदीप या युवा खेळाडूंनी भारताला ही मालिका जिंकून दिली आहे. आता धरमशालामध्येही या खेळाडूंकडून भारतीय संघाला अपेक्षा असतील. (Ind vs Eng 5th Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community