- ऋजुता लुकतुके
कसोटी क्रिकेटमध्ये असे क्षण दुर्मिळ असतात जिथे प्रतिस्पर्धी संघातील दोन खेळाडू एकत्र शंभरावी कसोटी खेळत असतात. पण, तो क्षण धरमशालामध्ये गुरुवारी येणार आहे. भारताचा विक्रमवारी फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि इंग्लंडचा मधल्या फळीतील फलंदाज जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) गुरुवारी आपल्या कारकीर्दीतील शंभरावा कसोटी सामना एकत्र खेळणार आहेत. असा प्रसंग यापूर्वी एकदाच घडला आहे. (Ind vs Eng 5th Test)
२००० साली इंग्लंडचा मायकेल ॲथरटन आणि ॲलेक स्टुअर्ट हे एकत्र आपली शंभरावी कसोटी खेळले होते. दोघं एकाच संघाचे होते. पण, इथं दोन प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू हा मापदंड एकत्र सर करणार आहेत. विशेष म्हणजे २००६ मध्ये सेंच्युरियन इथं झालेल्या कसोटीत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे चक्क ३ खेळाडू आपला शंभरावा कसोटी सामना खेळले होते. शॉन पोलॉक, जॅक कॅलिस हे आफ्रिकन संघाकडून तर न्यूझीलंडकडून स्टिव्हन फ्लेमिंग यांनी हा मापदंड सर केला होता. (Ind vs Eng 5th Test)
(हेही वाचा – Ind vs Eng 5th Test : रोहित शर्मा चॉपरने धरमशालात उतरला तो क्षण)
सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही खेळाडूंचा सत्कार
२०१३ मध्ये पर्थ कसोटीत ॲशेस मालिकेदरम्यान मायकेल क्लार्क आणि ॲलिस्टर कूक यांनी शंभरावी कसोटी एकत्र खेळली होती. पण, हे अपवादात्मक प्रसंग सोडले तर एकत्र शंभरावी कसोटी खेळण्याचे प्रसंग कसोटी क्रिकेटमध्ये विरळाच आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेनंतर असे काही क्षण येऊ शकतात. सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातही कसोटी मालिका सुरू आहे. आणि तिथं किवी कर्णधार केन विल्यमसन आणि तेज गोलंदाज टीम साऊदी एकत्र आपला शंभरावा कसोटी सामना खेळू शकतील. (Ind vs Eng 5th Test)
अश्विनने (Ravichandran Ashwin) या मालिकेत राजकोट कसोटी ५०० कसोटी बळींचा टप्पाही पूर्ण केला आहे. २०११ मध्ये भारताकडून कसोटी पदार्पण केलेल्या अश्विनने ५०० कसोटी बळींसह ३ हजार कसोटी धावाही केल्या आहेत. तर ३४ वर्षीय जिमी बेअरस्टो २०१२ मध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून इंग्लिश संघात आला. आणि तेव्हापासून तो इंग्लंडचा भरवशाचा मधल्या फळीतील फलंदाज आहे. इंग्लंडकडून १०० कसोटी सामने खेळलेला तो १७ वा खेळाडू असेल. गुरुवारी धरमशाला इथं सामना सुरू होण्यापूर्वी या दोन्ही खेळाडूंचा सत्कार केला जाईल. (Ind vs Eng 5th Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community