Paris Olympic 2024 : भारतीय टेबल टेनिस संघ पहिल्यांदाच ऑलिम्पिकसाठी पात्र

जागतिक क्रमवारीतील स्थानाच्या जोरावर भारतीय टेबल टेनिस संघाला पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. 

256
Paris Olympic 2024 : भारतीय टेबल टेनिस संघ पहिल्यांदाच ऑलिम्पिकसाठी पात्र
  • ऋजुता लुकतुके

भारताच्या महिला व पुरुष टेबल टेनिस संघांना इतिहास रचला असून पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या सांघिक प्रकारात स्थान मिळवलं आहे. अगदी अलीकडे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही भारतीय संघ खेळू शकला नव्हता. पण, आता थेट ऑलिम्पिक प्रवेश मिळवत भारतीय टेबल टेनिस संघाने कमाल केली आहे. (Paris Olympic 2024)

पुरुषांचा संघ सध्या जागतिक क्रमवारीत पंधराव्या स्थानावर आहे. तर महिलांचा तेराव्या. आणि पुरुष तसंच महिलांच्या सांघिक प्रकारात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण १६ संघ सहभागी होऊ शकतात. त्यामुळे ही संधी भारतीय टेबल टेनिस संघांना मिळाली आहे. भारताकडून ४ ऑलिम्पिक स्पर्धा खेळणारा शरथ कमलने ही बातमी सगळ्यात आधी ट्विटरवर पोस्ट केली. (Paris Olympic 2024)

‘माझ्यासाठी हा सुंदर अनुभव असणार आहे. मी माझी शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा खेळणार आहे. आणि त्याचवेळी भारतीय संघाचा ऑलिम्पिक सांघिक प्रकारात प्रवेश झालेला असेल. मला हा आनंद शब्दांत वर्णन करता येत नाहीए. मागची दोन वर्षं आम्ही खेळाडूंनी याच गोष्टीवर लक्ष केंद्रीत केलं होतं. आणि त्याचं फळ आम्हाला मिळतंय,’ अशा भावना शरथ यांनी व्यक्त केल्या. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – Ind vs Pak T20 World Cup : भारत वि. पाक सामन्यासाठी न्यूयॉर्कमधील नसॉ स्टेडिअम ‘असं’ तयार होतंय!)

२००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा टेबल टेनिसच्या सांघिक प्रकाराला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळालं. त्यानंतर पहिल्यांदाच भारतीय संघाला खेळण्याची संधी मिळणार आहे. (Paris Olympic 2024)

सांघिक प्रकारात १६ संघ असल्यामुळे स्पर्धेचा ड्रॉ पाडण्यात येईल. आणि पहिल्या फेरीचा अडथळा पार झाला तरी संघाला उपउपांत्य फेरीत पोहोचता येणार आहे. सांघिक स्पर्धेत खेळण्याचा आणखी एक फायदा भारतीय संघाला मिळेल. सांघिक पात्रतेमुळे आता वैयक्तिक प्रकारातही प्रत्येकी २ भारतीय खेळाडूंना थेट प्रवेश मिळेल. (Paris Olympic 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.