लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पश्चिम बंगालमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. या ठिकाणी आतापासूनच प्रचाराला सुरुवात झाली असताना तृणमूल काँग्रेसच्या (TMC) नेत्याची जीभ घसरली आहे. तृणमूल काँग्रेसचे आमदार रामेंदू सिन्हा रॉय यांनी एका रॅलीत वक्तव्य करताना अयोध्येत उभारलेल्या राम मंदिराचे वर्णन ‘अपवित्र स्थळ’ असे केले. त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच त्याला भाजपाने जोरदार सुनावले.
तृणमूल काँग्रेसचे (TMC) आमदार रामेंदू सिन्हा रॉय यांनी ‘अयोध्येत राम मंदिर बांधले गेले आहे आणि कोणत्याही हिंदूने राम मंदिरात पूजा करण्यासाठी जाऊ नये. जर पंतप्रधान मोदी ब्राह्मण नाहीत, तर ते प्राणप्रतिष्ठा कसे करू शकतात? असे म्हटले. त्यावर भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी चोख प्रत्युत्तर दिले. “ही टीएमसी नेत्यांची भाषा आहे. त्यांनी प्रभू रामाबद्दल TMC नेतृत्वाचा आदर दाखवला आहे. टीएमसी आमदाराच्या टिप्पणीमुळे जगभरातील हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल.
Join Our WhatsApp Community